सिंधुदुर्गात महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा
96413
सिंधुदुर्गात महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा
पालकमंत्री नीतेश राणे : जिल्हा परिषदेवर भाजपच बाजी मारेल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता विरोधकच राहिले नाही. महाविकास आघाडी संपली आहे. आता आमच्यामध्ये महायुतीतील पक्षांत स्पर्धा होणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील १९ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येणार. सत्तेसाठी २७ लागत असल्याने अन्य दोन मतदारसंघांत केवळ ८ निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणारच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके व सहकाऱ्यांच्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालयात आज दुपारी पक्षप्रवेश कार्यक्रम मंत्री राणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजप अध्यक्ष सुधीर नकाशे, संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, बंड्या मांजरेकर आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘खांबाळे गावात भाजप कार्यकर्ते जास्तीतजास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, कधीच १०० टक्के यश मिळाले नाही. मंगेश लोके यांच्या भाजप प्रवेशाने खांबाळे गावासह वैभववाडी तालुक्यात शत-प्रतिशत भाजप झाली आहे. माझ्या आमदारकीच्या दहा वर्षांत माझ्यात आणि लोके यांच्यात स्पर्धात्मक वातावरण राहिले आहे. मला नेहमी वाटते की विकासासाठी एकाच पक्षाच्या झेंड्याखाली सर्वांनी आले पाहिजे. ते काम लोके यांनी केले आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. खांबाळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तुमचा हक्काचा आमदार, पालकमंत्री आहे. तुम्ही मागायचे आणि मी देणार. रस्ते, पाणी, वीज ही नेहमीची कामे होतच राहतील. मात्र, खांबाळे गाव मॉडेल करण्यासाठी विविध प्रकल्प सूचवा. त्यासाठी आपण प्रयत्न करू.’’
.......................
पक्षाचा झेंडा घरोघरी न्या
मंत्री राणे यांनी, आता विरोधक शिल्लक नाहीत. मात्र, तुम्ही आपापसात भांडू नका. पक्षाचा झेंडा घेऊन घरोघरी जा. पक्षाचे सर्व कार्यक्रम यशस्वी राबवा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष सावंत यांनी, कणकवली विधानसभेत आता विरोधक शिल्लकच राहिले नाहीत. मंगेश लोके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजप विविध जबाबदारी देणार आहे. सर्वांनी शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. लोके यांनी मला कोणतेही पद दिले नाही तरी चालेल. मात्र, खांबाळे गावाचा विकास करावा. केवळ गावाच्या विकासासाठी मी प्रवेश करीत आहे, असे सांगितले.
......................
यांनी केला प्रवेश
वैभववाडी तालुका ठाकरे शिवसेना प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिगंबर पाटील, खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, निमअरुळे शाखाप्रमुख विलास इस्वलकर, कोकिसरे महिला शाखा प्रमुख सोनाली पवार, माजी शाखाप्रमुख परेश सावंत, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, माजी सरपंच गौरी पवार, संजय साळुंखे, विठोबा सुतार, संचिता गुरव, सारिका सुतार यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, सोसायटी आजी-माजी संचालक आदींसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.