कोकण
मळेवाडमध्ये आरोग्य चिकित्सा शिबिर
96420
मळेवाडमध्ये आरोग्य चिकित्सा शिबिर
आरोंदा ः प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत नुकतेच आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर, डॉ. विक्रम मस्के, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात महिलांची वैयक्तिक तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, ईसीजी करण्यात आली. महिलांची तपासणी करण्यासाठी डॉ. नवांगुळ, डॉ. अदिती ठाकर, डॉ. मस्के यांचे सहकार्य लाभले. यावेळी आरोग्य सहायक यू. टी. राणे, आरोग्य सहायक पी. आर. चव्हाण, आरोग्य सहायिका खडपकर, आरोलकर आदी उपस्थित होते.