कोकण
बांद्यात दुर्गामातांचे उत्साहात विसर्जन
96419
बांद्यात दुर्गामाता मूर्तींचे थाटात विसर्जन
बांदा ः शहरात प्रतिष्ठापना केलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गामाता मूर्तींचे भव्य मिरवणुकीने व ढोल ताशांच्या गजरात तेरेखोल नदीपात्रात गुरुवारी (ता. २) सायंकाळी उशिरा विसर्जन करण्यात आले. शहरात गांधीचौक, कट्टा कॉर्नर, आळवाडी, निमजगा येथे नवरात्रोत्सव मंडळातर्फे दुर्गामातांचे पूजन केले होते. गेल्या ९ दिवसांत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महिला व मुलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी उशिरा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. रात्री उशिरा आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.