धामापूर तलावाच्या परिसरात स्वच्छता

धामापूर तलावाच्या परिसरात स्वच्छता

Published on

धामापूर तलावाच्या
परिसरात स्वच्छता
कुडाळ ः वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र धामापूरमधील धामापूर तलाव येथे स्वच्छता मोहीम व वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमास उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल (कुडाळ) संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल सचिन शिरतुडे, कुडाळ रेंजचे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, धामापूर सरपंच श्रीम. परब, उपसरपंच श्री. निवतकर, सम्यंतक संस्थेचे सभासद व ग्रामस्थ यांच्या सहभागातून धामापूर तलावालगत वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवास घातक कचरा गोळा करून सफाई केली. उपवनसंरक्षक शर्मा व सरपंच परब यांच्या हस्ते वनक्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. उपवनसंरक्षक शर्मा यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
-----
तुळस नेत्र शिबिरात
९८ जणांची चिकित्सा
वेंगुर्ले ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविल्या जात असलेल्या सेवा पंधरवड्याअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर तुळस येथे आयोजित मोफत नमो नेत्र चिकित्सा शिबिरात ९८ जणांची चिकित्सा करण्यात आली. वेंगुर्ले भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, बुथ अध्यक्ष पिंट्या राऊळ, प्रमोद गोळम, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष वैभव होडावडेकर, रामचंद्र परब, आशा सेविका आदी उपस्थित होते. नेत्रचिकित्सक डॉ. तेली, डॉ. गंद्रे यांचे प्रतिनिधी उदय दाभोलकर आणि त्यांच्या चमूने रुग्णांची नेत्र चिकित्सा केली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी सरपंच विजय रेडकर यांनी आभार मानले.
........................
ज्येष्ठ नागरिकांचा
गिर्ये येथे सत्कार
देवगड ः गिर्ये येथे आंतराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पोलिस ठाणे विजयदुर्ग, ग्रामपंचायत गिर्ये, पोलिसपाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. विजयदुर्ग उपनिरिक्षक श्री. जाधव, सौ. घोडके, श्री. पडेलकर, सरपंच लता गिरकर, उपसरपंच मनाली गांवकर, तलाठी नाडकर्णी, ग्रामसेवक आदित्य कदम, पोलिसपाटील संतोष दुधवडकर, नीलेश मोंडकर, ज्येष्ठ नागरिक डॉ. पोकळे, पांडुरंग घाटये, जनू पुजारे, भाई म्हादनाक, शंकर पोसम, बाबा घाडी आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन, इतर समस्या, सायबर फसवणूक याबाबत जाधव व घोडके यांनी मार्गदर्शन केले. पोलिसपाटील दुधवडकर यांनी प्रस्तावना केली. सरपंच गिरकर यांनी आभार मानले.
---
वेंगुर्ले वाचनालयास
दहा हजारांची देणगी
वेंगुर्ले ः नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेस गोवा येथील सुधीर आठलेकर यांनी आपले वडील (कै.) वामन आठलेकर यांच्या स्मरणार्थ पाच हजारांची देणगी दिली. तसेच शिरोडा येथील बा. म. गोगटे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्रीराम दीक्षित यांनी पाच हजारांची देणगी दिली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कैवल्य पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com