''त्या'' भाजप प्रवक्त्यावर कायदेशीर कारवाई करा
96622
‘त्या’ भाजप प्रवक्त्यावर
कायदेशीर कारवाई करा
देवगडमध्ये काँग्रेसची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः एका भाजप प्रवक्त्यांनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याचा हवाला देत त्यांच्याविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली. आपल्या मागणीचे निवेदन येथील पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांना काँग्रेसतर्फे देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, काँग्रेसचे जिल्हा व्यापार उद्योग अध्यक्ष तुषार भाबल, दशरथ उर्फ बंड्या मेस्त्री, सजाऊद्दीन सोलकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, एका भाजप प्रवक्त्याने २७ सप्टेंबरला एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. याचा हवाला देत या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.