मुलांवर शिवसंस्कार रुजवणे आवश्यक

मुलांवर शिवसंस्कार रुजवणे आवश्यक

Published on

96624

मुलांवर शिवसंस्कार रुजवणे आवश्यक

नीतेश राणे ः सावंतवाडीत सन्मान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच शिवसंस्कार रुजविणे काळाची गरज आहे. हिंदुत्वाचा आपला ज्वलंत इतिहास आपणच मुलांपर्यंत नेऊन हिंदुत्वाचे बाळकडू लहानपणीच मुलांना द्यायला हवे. शिव संस्कारच्या माध्यमातून नव्या पिढीला हे शिव विचार देण्याचे महान कार्य सुरू आहे. त्यामुळे असे कार्य करणाऱ्या संस्थांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवसंस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना त्यांनी संबोधित केले. श्री. राणे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्‌घाटन झाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जेष्ठ पत्रकार संदीप देसाई, शिवसंस्कारचे अध्यक्ष श्री. गणेश ठाकुर, डॉ. सोनल लेले, सुधीर थोरात, रूपेश मोरे, अभिजीत राऊळ, पंकज भोसले, भुषण साटम, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘शिव संस्कार नाव फार महत्त्वाचे आहे. आपण मुलांना तसेच हिंदू समाजाला कोणता संस्कार देतो हे महत्त्वाचे आहे. बालपणापासून मुलांना किती कडवट बनवतो यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे.’’ दरम्यान, या सन्मान सोहळ्यात सुधीर थारात (श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिवशंभू विचार मंच, पुणे), रणजित हिर्लेकर (कोकण इतिहास परिषद, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष) आणि प्रथमेश खामकर (युवा इतिहास अभ्यासक, पुणे) यांना श्री. राणे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सन्मान सोहळ्यात तळवडे जनता विद्यालयाचे अध्यापक विजय सोनवणे, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांनाही सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com