स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा
96630
स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा
विक्रांत सावंत; आरपीडी प्रशालेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्पर्धात्मक जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवावा. समाजातील घडामोडी ओळखून यशस्वीतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संस्थेतर्फे येथील राणी पार्वतीदेवी (आरपीडी) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २०२४-२५ या वर्षातील विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माध्यमिक विभाग (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या सोहम कोरगावकर याचा विशेष सन्मान झाला. तसेच पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेत प्रथम आलेली वैदेही शेटवे, द्वितीय प्रज्वल कुडतरकर व तृतीय आरोही देऊसकर यांना गौरविले.
माजी कलाशिक्षक बाबुराव मालवणकर पुरस्कृत इंटरमिजिएट शासकीय ग्रेड परीक्षा २०२४-२५ मध्ये प्रथम श्रेणी मिळवलेले योगेश जोशी, प्रणव साधले, नक्षत्रा वर्णेकर, साईश बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. निबंध, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेले जान्हवी करमळकर, आद्या प्रभुगावकर, वैदेही शेटवे, उत्कर्ष आदारी, आस्था लिंगवत, कर्तव्य बांदिवडेकर व आर्या सावंत यांचे कौतुक करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित केले. रेश्मा राणे, प्रीती सावंत, शुभांगी देसाई, मानसी नागवेकर, स्वरा शिरोडकर, नामदेव मुठे, दशरथ शृंगारे, पूनम कदम, योगेश गावित आदी शिक्षकांचा सन्मान झाला. संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक सतीश बागवे आदी उपस्थित होते. सहाय्यक शिक्षिका पूनम कदम यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य सुमेधा नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.