रत्नागिरी- लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरीचे खेळाडू चमकले
rat5p25.jpg-
96681
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ड्युअथलॉन स्पर्धेच्या विजेत्या रुचिरा जाधव-साळवी व ट्रायथलॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे अभिजित पड्याळ.
----------
लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरीचे खेळाडू चमकले
केएससी ; अभिजित पड्याळ, रुचिरा जाधव-साळवींचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : कोल्हापूर स्पोर्टस् क्लब आयोजित रविवारी लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि कोकण ट्रायथलिट क्लबचे खेळाडू चमकले. रत्नागिरीच्या अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव-साळवी यांनी ड्युओथलॉनमध्ये पोडियम मिळवले, तर विनायक पावसकर यांनी ट्रायथलॉनमध्ये चमकदार कामगिरी केली.
लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, कोकण ट्रायथलिट क्लबच्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त धावपटू, सायकलपटू, जलतरणपटू सहभागी झाले. या तीनही क्लबमध्ये सक्रिय असलेले डॉ. नितीन सनगर या उपक्रमाचे इव्हेंट अँबॅसिडर होते.
ड्युओथलॉन, ट्रायथलॉन स्पर्धेत अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव- साळवी यांनी ड्युओथलॉन प्रकारात पोडियम फिनिश केला. विनायक पावसकर यांनी देखील ऑलिंम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अगदी थोड्या फरकाने त्यांचे पोडियम हुकले. तिन्ही क्लबच्या माध्यमातून कोअर ट्रेनिंग, ट्रायथलॉन ट्रेनिंगचा सराव या सर्वानी केला. इतर सर्व सहभागी स्पर्धकांनी देखील आपापल्या क्रीडाप्रकारात निर्धारित वेळेत फिनिश लाईन पार केली.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलपटू दररोज रत्नागिरी तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये रपेट मारत असतात. नित्यनिरन्तरगतिशीला: या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची वाटचाल सुरू आहे. तसेच कोकणामध्ये मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सायकलिंगला धावपट्टूंची जोड मिळते आहे. दर रविवारची प्रॅक्टिस रन म्हणजे सर्व वयोगटातील धावपटूंसाठी एक पर्वणी ठरते. यालाच जोड मिळाली आहे कोकण ट्रायथलिट क्लबची, ज्याच्या माध्यमातून ट्रायथलॉन तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करून ट्रायथलॉनसाठी कोकणवासीय तयार होत आहेत, हे आजच्या यशाने दाखवून दिले आहे.
चौकट
कुटुंबाचे मोलाचं सहकार्य
ट्रायथलॉन तसेच ड्युओथलॉन स्पर्धेत कुटुंबाचे मोलाचं सहकार्य लाभल्यामुळेच ही कामगिरी करता आल्याचं अभिजीत पड्याळ, रुचिरा जाधव-साळवी, विनायक पावसकर तसेच सर्व सहभागी खेळाडूंनी व्यक्त केले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन आणि कोकण ट्रायथलिट क्लबच्या माध्यमातून कोकणामध्ये आणि रत्नागिरी शहरामध्ये क्रीडा संस्कृती वृद्धिंगत होत असल्याचे हे द्योतक असल्याचे विजेत्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.