आझाद मैदानावर ९ ला कुणबी मोर्चा

आझाद मैदानावर ९ ला कुणबी मोर्चा

Published on

आझाद मैदानावर
९ला कुणबी मोर्चा
खेड : ओबीसींचे अस्तित्व टिकवण्यासह ओबीसीच्या न्यायहक्कांसाठी ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानात कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने कुणबी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसींचे आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आता कोणतीही चर्चा न करता थेट तमाम कुणबी समाजबांधवांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तालुक्यातील कुणबी समाजबांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघाचे युवा अध्यक्ष सुरेश जोगळे यांनी केले आहे.

एलटीटी-तिरूवअनंतपूरम
धावणार २७ नोव्हेंबरपर्यंत
खेड : कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी २५ सप्टेंबरपासून चालवण्यात येत असलेली एलटीटी- तिरूवअनंतपूरम रेल्वे २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. एलटीटी-तिरूवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता तिरूवअनंतपूरमला पोहोचते. परतीच्या प्रवासात तिरूवअनंतपूरम येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटीला पोहोचते. कोकण मार्गावर स्पेशलला पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव स्थानकात थांबे आहेत.

दीक्षिता तांबे राज्य
पात्रता परीक्षा उत्तीर्ण
खेड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर दीक्षिता तांबे यांनी एमएएमएड् शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्रातील अत्यंत कठीण मानली जाणारी राज्यपात्रता परीक्षा (सीईटी) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत स्वप्न साकार केले. तांबे यांनी २००९-१० मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करत ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकवले. याबद्दल जिल्हा परिषदेने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. महाराष्ट्र टॅलेंट परीक्षेत विद्यार्थी सर्च ७ गुणवत्ता यादीत झळकवत ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती परीक्षेतही अनेक विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कास्यपदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा महिला नागरी पतसंस्थेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा असून, महाराष्ट्र साहित्य परिषद खेड शाखेच्या प्रमुख कार्यवाह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com