चिपळूण-कळंबस्तेतील देवराईत फुलांचा दरवळ

चिपळूण-कळंबस्तेतील देवराईत फुलांचा दरवळ

Published on

rat6p17.jpg-
96845
चिपळूणः कळंबस्ते येथील देवराईत फुललेली फुले.
-------------
देवराईच्या संकल्पनेला नवा आकार कळंबस्तेत फुलले बोटॅनिकल गार्डन
साडेतीन एकरात दुर्मिळ फुलझाडांची लागवड; पर्यावरणसंवर्धनासाठी कोकणात नवा आदर्श
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः तालुक्यातील कळंबस्ते येथे शासकीय जागेत साकारत असलेल्या देवराईअंतर्गत बोटॅनिकल गार्डनचा पहिला टप्पा आकार घेऊ लागला आहे. या प्रकल्पात लागवड केलेल्या विविध प्रकारच्या झाडांना बहार येऊ लागला आहे.
कोकणातील देवराईंचे कालानुरूप अस्तित्त्व कमी होत आहे. पर्यावरणरक्षणासाठी व दुर्मिळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्याकरिता सर्व पर्यावरण व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन कळंबस्ते येथे साडेतीन एकर जागेत देवराईची संकल्पना हाती घेण्यात आली. या कामात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर नाम फाउंडेशन, वनविभाग, काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यासाठी पुढे आल्या. तसेच पर्यावरणप्रेमी भाऊ काटदरे मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले. पहिल्या टप्प्यात बोटॅनिकल गार्डनमध्ये विविध प्रकारची फुलझाडे लागवड करण्यास सुरवात झाली. या गार्डनला बहर आला आहे. अनेक प्रकारची दुर्मिळ होत चाललेली फुलझाडे या ठिकाणी पुनःनिर्माण करून अत्यंत आकर्षक पद्धतीने दुर्मिळ होत चाललेल्या फुलांचे बोटॅनिकल गार्डन येत्या तीन-चार महिन्यांतच नागरिकांसाठी खुले होणार आहे.

चौकट
१९ प्रजातींची १२५२ झाडांची रूजवात
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत सामूहिक श्रमदानातून वृक्षारोपण केले आहे. येथे एकाच दिवशी १९ विविध प्रजातींची १२५२ झाडे लावण्यात आली. येथे लागवडीपूर्वी चर खोदून ठिंबक सिंचनची व्यवस्था केली आहे. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी बोअरवेलचीदेखील व्यवस्था केली आहे. त्यानुसार एका विभागात एकाच जातीच्या झाडांची लागवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com