‘सेवा पंधरवडा’ ठरला जनसेवेचा उत्सव

‘सेवा पंधरवडा’ ठरला जनसेवेचा उत्सव

Published on

96858

‘सेवा पंधरवडा’ ठरला जनसेवेचा उत्सव

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल; भाजपची साथ, विविध उपक्रमांना प्रतिसाद


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः राष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविलेल्या पक्षस्तरीय सेवा पंधरवडा अभियानात राज्यात अव्वल काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले आहे. पक्षाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
येथील जिल्हा परिषदमधील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्न देसाई, राज्य प्रतिनिधी संध्या तेरसे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सावंत यांनी जिल्ह्यात भाजपची १४ मंडले आहेत. या सर्व मंडळांवर हे उपक्रम पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या सहभागाने पार पडले, असे सांगत यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमाच्या नोंदीसाठी पक्षाने ‘सरल अॅप’ दिला होता. त्यामुळे त्यात ठिकाण, वेळ, उपस्थिती याची ऑनलाईन नोंद करावी लागते. त्यामुळे केवळ कागदपत्रांवर हे कार्यक्रम झाले नसून प्रत्यक्षात झाल्याची माहिती श्री. सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘पक्षाने सेवा पंधरवडा अंतर्गत ठरवून दिल्यानुसार जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात १२२ स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आले. यात ४३७६ नागरिकांनी सहभाग घेतला. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचे ५० कार्यक्रम घेण्यात आले. ९२३ वृक्ष आपल्या आईच्या नावाने लावले. आठ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली. त्यातून ६४५ जणांनी रक्तदान केले. जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाची प्रभुद्ध नागरी संमेलने कणकवली येथे घेतली. त्यात ५० नागरिक सहभागी झाले. शासनाच्या मदतीने जिल्ह्यात ३१ आरोग्य चिकित्सा शिबिरे घेतली. यात ४ हजार ७३ जणांनी लाभ घेतला. कसाल आणि जानवली येथे दिव्यांग मेळावा आणि साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा २१० जणांनी लाभ घेतला. व्होकल फॉर लोकल अंतर्गत कुडाळ, वेंगुर्ले शहर आणि वजराठ अशा तीन ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. एकूण २०५ जणांनी आपण उत्पादित केलेला माल या प्रदर्शनात ठेवला होता. विकसित भारत अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत १४५० जणांनी भाग घेतला. सावंतवाडी मोती तलाव येथे मोदी विकास मॅरेथॉन घेण्यात आली. त्यात ४५० पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला. कुडाळ आणि कणकवली येथे आयोजित रांगोळी स्पर्धेत २५० जण सहभागी झाले होते.’’
-------
सेवा, समर्पण आणि सहभाग
श्री. सावंत म्हणाले, ‘‘२५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ९२१ बुथवर ६५५ कार्यक्रम घेण्यात आले. यात ६४४२ लोकांनी सहभाग नोंदविला. नमो नेत्र संजीवनी अंतर्गत कुडाळ येथे एक आणि वेंगुर्ले तालुक्यात आठ असे नेत्र तपासणी शिबिरे घेतली. याचा १३४४ जणांनी लाभ घेतला. बांदा, वेंगुर्ले आणि पडेल अशा तीन ठिकाणी आयोजित महिला मेळाव्यात ८१० महिलांनी उपस्थिती दर्शविली. तर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ३६२० जणांनी सहभाग घेतला. यासाठी जिल्ह्यात ४०८ कार्यक्रम आयोजित केले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com