शिवडावात भाजपतर्फे
स्वच्छता, वृक्षारोपण

शिवडावात भाजपतर्फे स्वच्छता, वृक्षारोपण

Published on

शिवडावात भाजपतर्फे
स्वच्छता, वृक्षारोपण
कणकवली ः शिवडाव भाजपतर्फे सेवा पंधरवडानिमित्त भांद्रुकीदेवी मंदिर, ओटोसवाडी व शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव माळ येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्त विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजप बूथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन गावकर, बूथ अध्यक्ष मकरंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शिरसाठ, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अजित तांबे, उपाध्यक्ष सुंदर जाधव, शिवडाव सोसायटी संचालक मिलिंद गावकर, सुनील गावकर, संतोष विचारे, बाळकृष्ण मेस्त्री, सागर मळये, प्रसाद सावंत, चेतन साटम, सुदेश कराळे, दीपक सावंत, रविनारायण साटम, श्रेयस साटम, उपेंद्र नाडकर्णी, अशोक मेस्त्री, दशरथ जाधव, पंढरी जाधव, सुशील शिरसाठ, सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील वर्दम आदी उपस्थित होते. ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
.....................
श्री दुर्गामाता दौडला
तुळस येथे प्रतिसाद
वेंगुर्ले ः तुळस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित ‘श्री दुर्गामाता दौड तुळस २०२५’ उत्साहात पार पडली. या दौडचे हे दुसरे वर्ष होते. ही दौड गावाच्या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य बनली. कणकवली येथील पथकाने सादर केलेले चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळ यावर्षीच्या दौडचे मुख्य आकर्षण होते. लाठी-काठी आणि तलवारबाजीची प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी दाद दिली. या यशस्वी आयोजनामागे पोलिसांचे सहकार्य लाभले. त्यांनी केलेल्या उत्तम सुरक्षा व्यवस्थेमुळे आणि वाहतूक व्यवस्थापनामुळे दौड शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. पावसानेही उसंत घेतल्याने दौडीत कोणताही अडथळा आला नाही. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या दौडला प्रचंड प्रतिसाद दिला. ज्यामुळे या धार्मिक उपक्रमाला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. हा उत्साह असाच कायम राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
---
कुडाळ येथे किल्ला,
आकाश कंदील स्पर्धा
कुडाळ ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील दत्तराज मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त आकाश कंदील व शिवकालीन किल्ला बनविणे स्पर्धांचे आयोजन केले आहे. बांबू व कागदांचा वापर करून पारंपरिक आकाश कंदील (प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता) बनविणे आवश्यक आहे. किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये, उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी १ हजार रुपये, आकाश कंदील स्पर्धेसाठी ३ हजार, २ हजार, १ हजार तसेच उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी ५०० रुपये अशी पारितोषिके आहेत. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सर्वांना या स्पर्धेत भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी उदय बल्लाळ यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com