गिरीभ्रमणातील वाटाडे भागोजी भंडारे यांचे निधन
-rat६p२२.jpg-
२५N९६८८८
भागोजी भंडारे
----
गिरीभ्रमणातील वाटाडे
भागोजी भंडारे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : तालुक्यातील दुर्गप्रेमींसाठी मार्गदर्शक ठरलेले वाडी बेलदार (महिपतगड पायथा) येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भागोजी कोंडिराम भंडारे (वय ८५) यांचे निधन झाले.
महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड अशा दुर्गांची भ्रमती आव्हानात्मक असते. या कठीण गडरांगेतील जंगलातील पायवाटा, प्राणी, वनस्पती आणि भूगोल याचे अचूक ज्ञान असणारे भागोजी भंडारे हे त्या परिसरातील निसर्गप्रेमी व गडवेड्यांसाठी आधारस्तंभ होते. महिपतगडावरील पुरातन अवशेष दाखवणे तसेच महिपतगडावरून हातलोट खिंड–मधुमकरंदगड–प्रतापगड असा रेंज ट्रेक करणाऱ्यांना मार्गदर्शन करणे हे काम भागोजी भंडारे नियमितपणे करत असत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. निसर्गाची सखोल माहिती असणाऱ्या व्यक्ती अलीकडे दुर्मिळ होत चालल्या आहेत. भागोजी भंडारे हे त्यापैकीच एक होते. त्यांनी गडभ्रमणाचा वारसा जपला. आता वाडी बेलदारमधील तरुणांनी त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगून शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य प्रवीण कदम यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.