‘मालवण-कुडाळ’साठी 
२४ कोटींचा विकासनिधी

‘मालवण-कुडाळ’साठी २४ कोटींचा विकासनिधी

Published on

96902
नीलेश राणे

‘मालवण-कुडाळ’साठी
२४ कोटींचा विकासनिधी

दत्ता सामंत ः आमदार राणेंचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण-कुडाळ मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनतेतून पहिल्या टप्प्यात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
मालवण कुडाळ मतदार संघात आता पहिल्या टप्प्यात २४ कोटी निधी मंजुरीबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त करताना खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आगामी काळातही मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा अंतर्गत ४ कोटी ६८ लक्ष, नागरी सुविधा अंतर्गत १ कोटी ५० लक्ष, ग्रामीण मार्गसाठी २ कोटी ५० लक्ष, क वर्ग यात्रास्थळ विकास साठी १ कोटी, इतर जिल्हा मार्गसाठी १ कोटी ५० लक्ष, नवीन ट्रान्सफार्मर व स्ट्रीट लाईटसाठी २ कोटी, शाळा इमारतीसाठी १ कोटी ६० लक्ष, लहान मासेमारी बंदरांचा विकास १ कोटी ७७ लक्ष असा सुमारे २४ कोटी निधी वरील विविध हेड खाली पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.
गेल्या दहा महिन्यात आमदार राणे यांनी मतदारसंघात शेकडो कोटी निधी मंजूर करून आणला. देवबाग किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने एकाचवेळी १५८ कोटी निधी मंजूर करून घेत आमदार निलेश राणे यांच्या कामाची धमक दिसून आली. यापुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राणे अधिकाधिक विकासनिधी मंजूर करून आणतील. त्यांचे व्हिजन असलेला आदर्श मतदार संघ बनवतील असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com