करियर कट्टाअंतर्गत विद्यार्थी संवाद
rat७p६.jpg-
२५N९७०५९
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. यशवंत शितोळे यांचा सत्कार करताना प्र. प्राचार्य मधुरा पाटील. सोबत प्राध्यापक.
करिअर कट्टाअंतर्गत विद्यार्थी संवाद
‘देव, घैसास, कीर’मध्ये आयोजन; विकासवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संवाद कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग व आयक्युएसी यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलचा वापर हा कशासाठी केला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. मोबाइलचा वापर करून आपल्या करिअरला योग्य दिशा देण्याचे काम आपण करू शकतो, हे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबतही मार्गदर्शन केले. करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचीही या वेळी शितोळे यांनी माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी करिअर कट्टा रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, आयक्युएसी समन्वयक राखी साळगावकर आणि महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. हर्षदा लिंगायत उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले. प्रा. स्मार्था कीर यांनी आभार मानले.