हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण
rat७p५.jpg-
२५N९७०५८
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांसह मागे उभे मान्यवर.
हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित मालती मधुकर देसाई यांच्या स्मरणार्थ मराठी इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच अंबर हॉल येथे झाले.
या स्पर्धेचा निकाल असा : पहिली ते चौथी गट (प्रथम, द्वितीय या प्रमाणे) ः इंग्रजी विभाग-अनय साळवी, द्वितीय- सानवी वाळवे. पाचवी ते सहावी गट - मराठी विभाग-प्रथम-शुभ्रा शिंदे, द्वितीय-शौर्या देसाई. पाचवी ते सहावी गट-इंग्रजी ः प्रथम- शुभ्रा शिंदे, द्वितीय- रोनक सावंत. इ. सातवी ते नववी- मराठी-प्रथम-धनश्री नाईक, द्वितीय-श्रीया लोटणकर. इ. सातवी ते नववी- इंग्रजी-प्रथम-आराध्या साळवी, द्वितीय-भूमी शिंदे. ज्येष्ठ नागरिक-मराठी- प्रथम-राजश्री लोटणकर, इंग्रजी-प्रथम-सूर्यकांत सावंत. या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, प्रमुख पाहुणे डॉ. अमित बागवे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, सल्लागार सतीश साळवी, प्रचार प्रमुख संतोष तावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, सल्लागार नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष प्राची शिंदे, सरचिटणीस योगेश साळवी आदींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.