कोकणातील सहकारी संस्थांसाठी विशेष आराखडा
सहकारी संस्थांसाठी विशेष आराखडा
प्रवीण दरेकर ः मुंबईतील मराठी माणसाला तिथेच थांबवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : विदर्भ आणि इतर भागातील यशस्वी सहकारी बँकांचा अभ्यास करून कोकणातील संस्थांसाठी एक विशेष सक्षम कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोकणात अपेक्षेनुसार, कामगिरी न करणाऱ्या काजू, मत्स्यप्रक्रिया उद्योग किंवा पतसंस्थांना भविष्यात आर्थिक ताकद दिली जाईल तसेच, पर्यटनासारख्या मोठ्या संधींना सहकारी तत्त्वावर उभे करून त्यांना आर्थिक बळ पुरवले जाईल, असे आमदार आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य सहकारी संघाच्या कोकणातील जिल्हा बोर्डाच्या विभागीय बैठकीत कोकणातील सहकार क्षेत्राचा सखोल आढावा घेतला. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे चित्र बदलण्यासाठी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार आणि स्वयं पुनर्विकास (सेल्फ रिडेव्हलपमेंट) या दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रांना बळकटी देण्यात येणार आहे. राज्याच्या सहकार शिखर संस्थेचे नेतृत्व करत असताना कोकणातील जिल्हा बँकांना एकत्र आणून मोठे विभागीय प्रकल्प उभारले जातील आणि लाडक्या बहिणींना उद्योजक बनवण्यासाठी आवश्यक अर्थपुरवठा केला जाईल. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि आवश्यकतेनुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक या प्रकल्पांना अर्थसाहाय्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चौकट
दहा नवीन सहकारी संस्था उभारणार
कोकणात सध्या ‘अ’ वर्गात असलेल्या पाच जिल्हा बँका आणि उत्तम चालणाऱ्या संस्थांना एकत्र आणून दहा नवीन सहकारी संस्था उभ्या करण्याचा संकल्प दरेकर यांनी जाहीर केला. शिवाय, कोकणातील काजू, नारळ, कोकम आणि मासेमारी या उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी सरकारचे अर्थसाहाय्य आणि बँकेचा पुरवठा यांचा समन्वय साधला जाईल. सहकार चळवळीला पायाभूत स्तरावर मजबूत करण्यासाठी लवकरच कोकण विभागासाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
-----
चौकट
मराठी माणसाला सक्षम करणार
मी कोकणच्या मातीतला असल्यामुळे, राज्यातल्या कारखान्यांना आणि सूतगिरण्यांना मुंबई जिल्हा बँकेतून कर्ज दिले जाते. या कोकणातील सहकारात काहीतरी व्हावे, या मानसिकतेतून आजच्या बैठकीतून सुरुवात केली आहे. या सर्व प्रयत्नांचा अंतिम उद्देश आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन मराठी माणसाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम संधी मिळवून देणे हा आहे, असे दरेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.