कोकण
पोफळी स्कूलमध्ये शास्त्री जयंती
पोफळी स्कूलमध्ये
लालबहादूर शास्त्री जयंती
चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शिशुविहार प्रमुख सुप्रिया वारे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्राथमिक विभागातील श्रेयस लोहार या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान केली होती. ते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.