गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी हवेत आणखी सीसीटीव्ही

गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी हवेत आणखी सीसीटीव्ही

Published on

- rat७p१३.jpg-
२५N९७०५४
राजापूर ः सीसीटीव्ही कॅमेरा (संग्रहित)
----
‘नेत्रा’ उपक्रमास बळ देण्याची गरज
राजापूरवासीयांचा आवाज; कॅमेरे वाढवा, गुन्हे थांबवा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः पोलिस प्रशासनाच्या ‘नेत्रा’ उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यात ६० ठिकाणी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरीही चोरी, घरफोड्यांवर अंकुश ठेवण्यात यश आलेले नाही. त्यात काही दिवसांपूर्वी एका महिलेला महामार्गावर लुटण्याची घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी उभारलेले कवच आणखी मजबूत करणे आवश्यक असून मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग सागरी महामार्ग, घाटमार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशद्वारे आदी मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे.
राजापूर शहरात होणाऱ्या सुरक्षितता आणि चोऱ्यांना आळा घालणे, अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा पोलिस प्रशासनाने निर्णय घेतला; नेत्रा उपक्रमांतर्गत पोलिस प्रशासनाने सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या केलेल्या आवाहनाला सरकारी, खासगी कार्यालये, बँका यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून तालुक्यामध्ये १७० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्यात चोरी आणि घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महामार्गावर एका वाहनचालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेला भरदिवसा लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या साऱ्‍यांवर पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. सध्या महामार्ग वा अन्य परिसरातील कॅमेऱ्यांमध्ये तपासासाठी आवश्यक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसवल्यास त्याचा अधिक फायदा होणार आहे.

चौकट
या ठिकाणी हवेत सीसीटीव्ही
मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथील पाचलफाटा, राजापूरचा डेपो परिसर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार अन् राजापूरची हद्द, मोसम-केळवलीकडे जाणारा रस्ता, अणुस्कुरा घाटमार्ग, पश्‍चिम भागातून जाणारा सागरी महामार्ग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.
---
कोट
सुरक्षिततेसाठी सरकारी आणि खासगी व्यवस्थापनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. त्यासोबत वर्दळीच्या आणि मोक्याच्या ठिकाणी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असून, त्या दृष्टीने विचार आणि प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- मनोहर गुरव, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com