कुणकेश्वर येथे ज्ञानेश्वरी पारायण
कुणकेश्वर येथे
ज्ञानेश्वरी पारायण
देवगड ः तालुक्यातील दाभोळे कोंडामा येथील श्री बाळूमामा देवालयातर्फे उद्यापासून (ता.८) शनिवारपर्यंत (ता.११) कुणकेश्वर येथील मंदिर परिसरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या काळात सायंकाळी ५.३० ते ६.३० या वळेत बंड्यातात्या महाराज कराडकर यांचे प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बबन बोडेकर आणि संजय बोडेकर यांनी केले आहे. कार्यक्रम असे ः पहाटे ४ ते ६ पर्यंत काकड आरती, सकाळी ७.३० ते ११.३० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ वाजता भोजन, २ ते ४.३० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत भजन व हरिपाठ, ५.३० ते ६.३० बंड्यातात्या महाराज कराडकर यांचे प्रवचन (विषय-सती आख्यान श्रीमत्भागवत चतुर्थ स्कंद), शनिवारी (ता.१३) सकाळी १० ते ११.३० पर्यंत बंड्यातात्या महाराज कराडकर यांचे काल्याचे कीर्तन, सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत महाप्रसाद.
---
सायबर गुन्ह्यांबाबत
कसालमध्ये जागृती
ओरोस ः जिल्हा सायबर पोलिस आणि सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायबर जनजागृती मासच्या अनुषंगाने श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसालच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज येथे ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, फिशिंग ऑनलाईन, आर्थिक व्यवहार फसवणुकीबाबत विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हेल्पलाईन क्रमांक सायबर फ्रॉड संदर्भात मदतीकरिता १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन केले. यावेळी समुद्र संदेशबाबतही माहिती दिली. या कार्यक्रमाला महिला हवालदार भक्ती सावंत, हवालदार अॅडवर्ड बुतेलो, महिला पोलिस शिपाई श्रीमती परब, शीतल नांदोसकर आदी उपस्थित होते.
.....................
वेंगुर्लेत भाजपमार्फत
गांधी, शास्त्रींना वंदन
वेंगुर्ले ः येथील भाजप कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त दीपक भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विष्णू परब, प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, राजबा सावंत, सुभाष बोवलेकर, अनिल तेंडोलकर, सत्यवान पालव, संजय मळगावकर, हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, चेतना रजपूत, श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, मनवेल फर्नांडिस, रसिका मठकर उपस्थित होते.
......................
देवगड आरक्षण
सोडत सोमवारी
देवगड ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीची मतदारसंघनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता.१३) सकाळी ११ वाजता ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघनिहाय नागरिकांसह सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.