कोमसापचे विश्वस्त अरुण नेरूरकर यांचे निधन

कोमसापचे विश्वस्त अरुण नेरूरकर यांचे निधन

Published on

rat७p१२.jpg-
२५N९७०५३
अरुण नेरुरकर

‘कोमसाप’चे विश्वस्त
अरूण नेरुरकर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त, संस्थापक सदस्य अरुण अच्युत नेरुरकर (वय ८८) यांचे आज निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. आज सायंकाळी चर्मालय येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोमसापच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासोबत संस्था वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेरुरकर गेल्यामुळे संस्थेचे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जवळपास ३० वर्षे नेरुरकर हे रत्नागिरीच्या साहित्यक्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. रत्नागिरीच्या सांस्कृतिक वाटचालीत त्यांनी योगदान दिले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सहकार्याने हे संमेलन रंगले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
नेरुरकर यांच्या जाण्याने कोमसापचा आधारस्तंभ हरपला आहे. कोमसापसह साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. कोमसाप परिवाराचा सर्वांना जोडून ठेवणारा महत्त्वाचा दुवा निखळल्याची जाणीव मनाला पोरकं करून गेली, अशी प्रतिक्रिया कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com