कणकवलीत माजी नगरसेवकांना धक्का

कणकवलीत माजी नगरसेवकांना धक्का

Published on

97327

कणकवलीत माजी नगरसेवकांना धक्का

प्रभागनिहाय आरक्षण; नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ ः येथील नगरपंचायत प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज काढली. यात अनेक माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. त्‍यांना आता अन्य सुरक्षित प्रभाग शोधावे लागणार आहेत. शहरातील एकूण १७ पैकी ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत, तर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्ग असे आहे. येथील नगरपंचायत सभागृहात प्रांताधिकारी तथा नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीसाठी यंदाची निवडणूक ही पहिली निवडणूक असल्‍याचे निश्‍चित केले आहे. त्‍यामुळे आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढताना पूर्वीचे आरक्षण विचारात घेतले जाणार नाही, असे प्रांताधिकारी कातकर यांनी स्पष्‍ट केले.
एकूण १७ प्रभागांपैकी २ प्रभाग हे अनुसूचित जातीसाठी निश्‍चित आहेत. त्‍यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरातील प्रभाग ८ आणि प्रभाग ११ या दोन प्रभागांची या आरक्षणासाठी निवड करण्यात आली. त्‍यानंतर चिठ्ठी काढून यातील प्रभाग क्र. ११ हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आला. ओबीसी प्रवर्गासाठी ५ प्रभाग निश्‍चित झाले आहेत. त्‍यामुळे अनुसुचित जाती प्रभाग वगळता उर्वरित १५ प्रभागांच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्‍या. त्‍यातून ५ प्रभागांची सोडत काढली. यामध्ये शहरातील ४, ५, ७, १३ आणि १४ या प्रभागांत ओबीसी आरक्षण पडले. त्‍यातही ४, ५ आणि ७ हे प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. अनुसूचित जाती आणि ओबीसी आरक्षण निश्‍चित झाल्‍यानंतर उर्वरित १, २, ३, ६, ९, १०, १२, १५ १६ आणि १७ हे प्रभाग खुला असल्‍याचे प्रांताधिकारी कातकर यांनी जाहीर केले. नंतर या प्रभागातून ५ चिठ्ठ्या काढून महिलांसाठी आरक्षण निश्‍चित केले. त्‍यानुसार २, ६, ९, १० आणि १२ हे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले. विद्यामंदिर हायस्कूलमधील पाचवीचे विद्यार्थी भार्गवी केळुसकर, रितेश पाटील, वेदिका गंगावणे, कबीर आडोळे या विद्यार्थ्यानी आरक्षणाच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्‍या.
------------------
या दिग्‍गजांना धक्‍का
माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अबिद नाईक, विराज भोसले यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले. माजी विरोधी पक्षनेते सुशांत नाईक यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण निश्‍चित झाले. त्‍यामुळे आजच्या आरक्षण सोडतीचा या माजी नगरसेवकांना धक्‍का बसला असून, त्‍यांना आता निवडणूक लढायची असेल, तर अन्य प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे.
-----------------
प्रभाग सुरक्षित असलेले माजी नगरसेवक
कणकवलीतील माजी नगरसेवक प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, माही परुळेकर, रूपेश नार्वेकर, संजय कामतेकर आणि रवींद्र गायकवाड यांच्या प्रभागात पूर्वीचेच आरक्षण कायम राहिले आहे. त्‍यामुळे या माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्‍यता आहे.
------------
नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग, १ खुला, प्रभाग ः २ खुला महिला, प्रभाग ः ३ खुला, प्रभाग ः ४ ओबीसी महिला, प्रभाग ः ५ ओबीसी महिला, प्रभाग ः ६ खुला महिला, प्रभाग ः ७ ओबीसी महिला, प्रभाग ः ८ अनुसुचित जाती, प्रभाग ः ९ खुला महिला, प्रभाग ः १० खुला महिला, प्रभाग ः ११ अनु.जाती. महिला,
प्रभाग ः १२ खुला महिला, प्रभाग ः १३ ओबीसी, प्रभाग ः १४ ओबीसी, प्रभाग ः १५ खुला, प्रभाग ः १६ खुला, प्रभाग ः १७ खुला.
------------------
अशी आहे प्रभाग रचना
प्रभाग १ ः निम्मेवाडी, मधलीवाडी, प्रभाग २ ः वरचीवाडी, प्रभाग ३ ः बांधकरवाडी, प्रभाग ४ ः परबवाडी, शिवाजीनगर, प्रभाग ५ ः विद्यानगर, प्रभाग ६ ः दक्षिण बाजारपेठ, प्रभाग ७ ः उत्तर बाजारपेठ, प्रभाग ८ ः बौद्धवाडी, फौजदारवाडी, प्रभाग ९ ः टेंबवाडी, प्रभाग १० ः गांगोवाडी, प्रभाग ११ ः सोनगेवाडी, प्रभाग १२ ः हर्णेआळी, तेलीआळी, प्रभाग १३ ः नेहरूनगर, बिजलीनगर, प्रभाग १४ ः जळकेवाडी, प्रभाग १५ ः नाथ पै नगर, प्रभाग १६ ः शिवाजीनगर ते रेल्‍वे हद्दीपर्यंतचा भाग, प्रभाग १७ ः कनकनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com