चिपळूण-चिपळूण शहरातील जाहिरात फलक उतरवले

चिपळूण-चिपळूण शहरातील जाहिरात फलक उतरवले

Published on

rat8p6.jpg-
97278
चिपळूणः शहरात लागलेले राजकीय पक्षांचे बॅनर काढताना पालिकेचे कर्मचारी.
------------

चिपळूण पालिकेने उतरवले जाहिरात फलक
शहरात ३२ अनधिकृत फलक; बहुतांश राजकीय नेत्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : चिपळूण पालिकेने शहरातील शुभेच्छांचे जाहिरात फलक हटवण्यास सुरवात केली आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत हे काम चालू राहणार आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागप्रमुख संदेश टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. शहरात लागलेले ३२ अनधिकृत फलक आतापर्यंत काढले आहेत. त्यात बहुतांश जाहिरात फलकांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते व पुढाऱ्यांच्या फलकांचा समावेश आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील जाहिरातींचे फलक हटवण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात विविध धार्मिक सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छांचे फलक लावले होते, तर काहींनी वाढदिवस, विविध प्रकारची शिबिरे आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवण्यासाठी शुभेच्छा फलक लावले होते. यातील केवळ चार फलकांसाठी पालिकेने परवानगी दिली होती. परवानगी संपल्यानंतर संबंधितांनी ते फलक स्वखर्चाने काढावे नाहीतर पालिका कारवाई करेल, असा इशारा त्यांना देण्यात आला होता; मात्र मुदत संपल्यानंतरही हे फलक हटवले नाहीत. त्यामुळे पालिकेने मुदत संपलेले फलकही हटवले आहेत.

चौकट
निवडणुकांची चाहूल
बहादूरशेख नाक्यापासून पाग पॉवरहाऊसपर्यंत उड्डाणपुलाच्या पिलरवर अनेकांचे जाहिरात फलक झळक आहेत. तेही पालिका काढणार आहे. सध्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले फलक काढण्यात आले. खेडेकर क्रीडासंकुल, सांस्कृतिक केंद्र, भाजीमंडईच्या परिसरातील बॅनरही काढले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची लवकरच रणधुमाळी सुरू होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आता प्रभागातील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेर कधीही जाहीर होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com