चिपळूण ःचिपळुणातील आरक्षण सोडतीने इच्छुक सुखावले

चिपळूण ःचिपळुणातील आरक्षण सोडतीने इच्छुक सुखावले

Published on

ratchl83.jpg-
97360
चिपळूण ः आरक्षण सोडतप्रसंगी प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले.
--------------
चिपळूण नगरपालिकेत महिलाराजची चाहूल
५० टक्के आरक्षणासह सर्वसाधारण गटातही संधी; नगराध्यक्षपद खुलं झाल्याने नवा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीत सर्व इच्छुकांना दिलासा मिळाला. बहुतांशी इच्छुक उमेदवारांच्या मनासारखे आरक्षण पडल्याने सारेजण सुखावले आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी ५० टक्के आरक्षणप्रमाणे २८ पैकी १४ जागा राखीव असताना सर्वसाधारणमध्येही त्यांना मोठी संधी मिळणार असल्याने या निवडणुकीत महिलाराज चालण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चिपळूण नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थितीत बुधवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही आरक्षण सोडत झाली. या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ जागा निश्चित केल्या. यातील ४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण महिलांसाठी ९ जागा, सर्वसाधारणसाठी १० आणि अनुसूचित जाती महिलांसाठी १ जागा जाहीर करण्यात आली.
या आरक्षण सोडतीत माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनाही संधी चालून आली आहे. शहरातील प्रभाग ४ मधील उक्ताड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने माजी स्वीकृत नगरसेवक परिमल भोसले यांची संधी काहीशी हुकली आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले शिंदेसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या रावतळे ओझरवाडी परिसरातील प्रभाग १३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांचीही नगरसेवक पदासाठी संधी हुकली आहे. याच पद्धतीने माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या पारंपरिक खेंड बाजारपेठ प्रभागात अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे. यापूर्वी येथे अनुसूचित जाती आरक्षण पडले होते; मात्र याच प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने त्यांच्यासह इतर इच्छुकांना संधी मिळणार आहे.

चौकट
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १- गोवळकोट- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग २- गोवळकोट रोड- नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला व सर्वसाधारण
प्रभाग ३ - पेठमाप- नामाप्र महिला व सर्वसाधारण
प्रभाग ४- उक्ताड- नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग ५- वाणीआळी- नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग ६- मुरादपूर शंकरवाडी- नामाप्र महिला व सर्वसाधारण
प्रभाग ७- मार्कंडी-नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग ८- काविळतळी वांगडे मोहल्ला- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ९- राधाकृष्णनगर-सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १०- रॉयलनगर- नामाप्र महिला व सर्वसाधारण
प्रभाग ११- खेंड बाजारपेठ-अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग १२- पागमळा विरेश्वर कॉलनी- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १३- रावतळे ओझरवाडी- नामाप्र व सर्वसाधारण महिला
प्रभाग १४- पाग- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com