रत्नागिरी-टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा
रंगावली स्पर्धेस
उत्स्फुर्त प्रतिसाद
रत्नागिरी ः जीजीपीएसच्या स्वामी स्वरूपानंद पूर्व प्राथमिक विभागात पालकांसाठी रंगावली स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पालकांनी खूप सुंदर रांगोळ्या काढल्या. या रांगोळ्यांच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचे दर्शन झाले. स्पर्धेसाठी वृषाली दळी आणि शमिका पारकर परीक्षक होत्या. मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागप्रमुख अपूर्वा मुरकर आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.
----------
इम्तियाज सिद्दिकी
यांचे यश
रत्नागिरी ः सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कोकण विभागातील शिक्षकांसाठी कला क्रीडा महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा झाल्या. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण विभागीय स्तरावर वक्तृत्व आणि एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये मिस्त्री हायस्कूलचे शिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. याबद्दल त्यांना मुंबई येथे सेकंडरी स्कूल सोसायटीने गौरवले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, तालीम इमदादिया कमिटीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
-----------
कोतवडे हायस्कूलचे
क्रीडा स्पर्धेत यश
रत्नागिरी ः कोतवडे येथील विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सोहम रांबाडे याने शालेय तालुकास्तरीय तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. आता तो चिपळूणला जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. कोतवडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सोहमचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, उपखजिनदार सूर्यकांत कांबळे, कार्यकारिणी सदस्य रोशन कांबळे, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, क्रीडाशिक्षक खुळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--------
जांभेकर विद्यालयात
दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन
रत्नागिरीः गोदूताई जांभेकर विद्यालयात आय. बी. टी. विभागाच्यावतीने पारंपरिक हत्यारपूजन मुख्याध्यापिका संजना यांनी केले. आयबीटी कार्यशाळेमध्ये पार पडलेल्या या पूजनामध्ये विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध अवजारांची पूजा करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. पूजनाची संपूर्ण तयारी आयबीटी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केली. मुख्याध्यापिका तारी यांनी दसरा सणाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोन उलगडून सांगितला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यप्रणालीमध्ये शिस्त, निष्ठा आणि कौशल्य या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. हत्यारपूजनासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कामाविषयी अभिमान आणि आदराची भावना निर्माण होते, असे मार्गदर्शक शिक्षक मोहिते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.