रत्नागिरी-तर मत्स्य कार्यालयाला टाळे ठोकू

रत्नागिरी-तर मत्स्य कार्यालयाला टाळे ठोकू

Published on

rat8p18.jpg-
97346
रत्नागिरी ः बेकायदेशीर मासेमारीविरूद्ध शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडकले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-----------------

...तर मत्स्य कार्यालयाला टाळे ठोकू
शाश्वत मच्छीमार हक्क संघाची धडक ; बेकायदा पर्ससीननेट, एलईडी, मिनी पर्ससीननेट मासेमारी

चौकट
एक नजर
* सागरी सुरक्षारक्षक कुचकामी, त्यांना काढून टाका
* परवाना अधिकारी नियमाने वागत नाहीत
* १० वावाच्या आत पर्ससीन मासेमारी
* परवाना नसणाऱ्या मिनी पर्ससीनचा धुडगूस

रत्नागिरी, ता. ८ : सागरी जलधी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससीननेट, एलईडी आणि मिनी पर्ससीनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला सागरी सुरक्षारक्षकांचा आशीर्वाद आहे. त्यांना नोकरीवरून काढून टाका. चार मासे मिळावेत यासाठी ते कर्तव्य बासनात गुंडाळत आहेत. मत्स्यखात्याला पारंपरिक मच्छीमारांच्या १० वावामध्ये मासेमारी करणाऱ्या नौका ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येतात. मग ५ वावात पर्ससीनद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका का दिसत नाहीत0 यावर कारवाई झाली नाही तर आता आमचाही संयम ढळेल. मग आम्ही कार्यालयालादेखील टाळे ठोकू, असा सज्जड दम शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजीत उर्फ छोट्या भाटकर यांनी सहाय्यक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच 12.5 नॉटिकल मैलच्या आतील समुद्रात ही मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमार नौका बंदरातच होत्या. या सर्व घडामोडींमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे. त्यात एलईडी मासेमारी, मिनी पर्ससीननेट मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी नौकांवर कारवाई केली जात नाही, या मागणीसाठी आज शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले. रत्नागिरीतील कर्ला, राजिवडा, मिरकरवाडा, जयगड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू आहे. या ठिकाणी मत्स्यविभागाचे सागरी सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत; परंतु ते सुरक्षेचे काम करताना दिसत नाहीत. त्यात परवाना अधिकारी नियमाने वागत नाहीत. किनाऱ्यावर क्रेनने बोटीमध्ये जनरेटर चढवले जातात. एवढी मोठी क्रेन दिसत नाही का0 याचा अर्थ सर्वांच्या आशिर्वादाने एलईडी मासेमारी सुरू आहे. सुरक्षारक्षक आपले कर्तव्य पाळत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाका.
दहा वावापर्यंत आम्ही मासेमारी करताना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आमच्या नौका दिसतात. मग ५ वावामध्ये पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौका का दिसत नाहीत? आता आमचा संयम ढळत चालला आहे. आम्हाला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर कुचकामी ठरलेल्या मत्स्य विभागालादेखील टाळे ठोकू, असा इशारा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मत्स्यविभागाला देत मागण्यांचे निवेदन दिले.
------------
कोट
शास्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ आम्हाला भेटले. बेकायदेशीर एलईडी, पर्ससीननेट आणि मिनी पर्ससीननेट मासेमारीबाबत त्यांचा आक्षेप आहे. अशा बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई केली जाईल.
- स. वी कासेकर, प्रभारी सहाय्यक मत्स्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com