शब्दवेध अभिवाचन व निबंध स्पर्धा

शब्दवेध अभिवाचन व निबंध स्पर्धा

Published on

- rat९p१.jpg -
२५N९७४८६
रत्नागिरी : अभिवाचन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसह परीक्षक व अन्य मान्यवर.

तोरगलकर महाविद्यालयात
शब्दवेध अभिवाचन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन अभिवाचन आणि निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली. यात रत्नागिरी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
कनिष्ठ महाविद्यालय समिती प्रमुख पाटणकर व उपमुख्याध्यापिका जाधव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण दीप्ती कानविंदे व अमोल मयेकर यांनी तर निबंध स्पर्धेचे परीक्षण बोटके यांनी केले. शिर्के प्रशालेचे शिक्षक व र. ए. सोसायटीचे माजी सहकार्यवाह देवळेकर यांनी त्यांच्या मातोश्री कै. सुभद्रा देवळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बक्षिसाची रक्कम प्रायोजित केली. बक्षीस वितरण समारंभासाठी कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्ता सुधार समिती प्रमुख वालावलकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे, देवळेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धांचा गुणानुक्रमे निकाल असा : निबंध स्पर्धा- गट १ (९वी व १०वी) : स्वरूपा भाटवडेकर (जीजीपीएस), तीर्था मयेकर (पटवर्धन हायस्कूल), वेदा मांडवकर (महिला विद्यालय); गट २ (११वी व १२वी) : प्रणव हातिसकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), मुग्धा ढोर्लेकर (एसएमबीटी), कोमल वाईकर (एसएमबीटी). अभिवाचन स्पर्धा- गट १ : प्रथम- पूर्वा जोशी, पूर्वा निकम, पर्णिका परांजपे (फाटक हायस्कूल), द्वितीय-वैष्णवी चौगुले, शताक्षी भुर्ते (रा. भा. शिर्के प्रशाला), तृतीय– आदिती सावंत, भार्गवी गोखले, आरुणी दुधाळे (रा. भा. शिर्के प्रशाला); गट २ : प्रथम– बिल्वा रानडे (वि. स. गांगण आणि केळकर कॉलेज), द्वितीय-वीणा काळे, अर्पिता बापट, वैदेही वैद्य (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- स्वरदा केळकर, श्रीया केळकर, श्रावणी खांडेकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com