सीजीपीएच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप भागवत

सीजीपीएच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप भागवत

Published on

- rat९p७.jpg-
२५N९७४९३
डॉ. संदीप भागवत

चिपळूण ‘सीजीपीए’ अध्यक्षपदी डॉ. भागवत
नवीन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण; सचिवपदी डॉ. बेल्लारीकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (सीजीपीए) नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा चिपळूणमधील हॉटेलमध्ये पार पडला. या प्रसंगी डॉ. संदीप भागवत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, सचिवपदी डॉ. ओंकार बेल्लारीकर, खजिनदारपदी डॉ. अभिजित दुधाळ तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. स्नेहल जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया झाल्यानंतर लगेचच पदग्रहण सोहळा झाला. त्यानंतर भागवत यांनी संघटनेच्या कार्याचे व्यापक उद्दिष्ट सर्वांपुढे मांडले. बेल्लारीकर यांनी सर्व सदस्यांना संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन केले. दुधाळ यांनी संघटनेच्या प्रगतीसाठी पूर्ण कटिबद्धतेने काम करण्याचे आश्वासन दिले तर जोशी यांनी महिला डॉक्टरांच्या सहभागाची ग्वाही दिली. नव्या कमिटीचे सल्लागार म्हणून माजी अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, डॉ. अरुण पाटील आणि डॉ. ऋषिकेश चितळे हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. मंगेश वाजे यांनी दिवाळीनिमित्त स्वरसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
सोहळ्याला डॉ. अजित दाभोळकर, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. अल्ताफ सरगुरोह, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. अनिल शिगवण, डॉ. प्रसाद दळी, डॉ. दीपक विखारे, डॉ. संजय कलगुटकी, डॉ. यतीन मयेकर आदी उपस्थित होते.

चौकट
जलद प्रतिसाद दल स्थापन करणार
डॉक्टरांसाठी अद्ययावत उपचारपद्धतीवरील कार्यशाळा घेण्याचा तसेच चिपळूण व परिसरात आपत्तीप्रसंगी तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी डिझास्टर क्विक रिस्पॉन्स टीम (जलद प्रतिसाद दल) स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. संघटनेची ओळख केवळ व्यावसायिक नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांद्वारे घडवण्याचा मानस नूतन अध्यक्ष डॉ. भागवत यांनी व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com