ब्राह्मणदेव महिला भजन मंडळ प्रथम
swt914.jpg
97527
ठाणेः विजेत्या श्री ब्राह्मणदेव प्रासादिक महिला भजन मंडळाला गौरविताना मान्यवर.
ब्राह्मणदेव महिला भजन मंडळ प्रथम
‘कामगार कल्याण’ स्पर्धाः नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग गट कार्यालय चिपळूणतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या गटस्तरीय भजन स्पर्धेत श्री ब्राह्मणदेव प्रासादिक महिला भजन मंडळ (बुवा प्रियंका तवटे) यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली.
कामगार कल्याण केंद्र कणकवलीमार्फत नगरवाचनालय हॉल येथे गटस्तरीय महिला भजन स्पर्धा आयोजित केली. पोफळी, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पिंगुळी वसाहत, कुडाळ, महाड, मालवण अशा एकूण आठ संघानी सादरीकरण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेता ठरलेल्या कामगार कल्याण मालवण संघाला जानेवारीमध्ये हुतात्मा दिनानिमित्त रंगणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी कोकण गटातून मिळाली. द्वितिय परितोषिक कामगार कल्याण केंद्र महाड व तृतीय परितोषिक सावंतवाडी कामगार कल्याण केंद्र संघाने पटकावला. परीक्षण संगीततज्ज्ञ प्रा. शाहीर हरीभाऊ भिसे, मोहन मेस्त्री व तेजस्विता तेंडुलकर यांनी केले.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट तालसंचन प्रथम पोफळी संघ, व्दितिय कुडाळ संघ व तृतीय मालवण, सर्वोत्कृष्ट हार्मोनियम प्रथम कविता चव्हाण (कुडाळ), व्दितीय दिव्या गोसावी (महाड), तृतीय ऋतुजा सावंत (सावंतवाडी), सर्वोत्कृष्ट गायिका प्रथम प्रियांका तवटे (मालवण), व्दितिय स्नेहा आठवले (पोफळी), तृतीय दिव्या गोसावी (महाड) यांनी पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या भजन संघातील पखवाज वादक विराज राणे, तबलावादक हर्षद मेस्त्री, कोरससाठी साक्षी झोरे, नेहा देसाई, निधी पवार, काव्या पवार, मानवी देसाई, ईश्वरी करगुटकर, भूमिका वायगणकर आणि दिव्या वायगणकर यांनी उत्तम प्रकारे साथ दिली. विजेत्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज अध्यक्ष राजश्री साळुंखे, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, कामगार अधिकारी सुवर्णा पाटील-शिंदे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रभारी कामगार अधिकारी राजेंद्र निकम व आभार केंद्रसंचालक संतोष नेवरेकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.