नरकासुर स्पर्धेचे बांद्यात आयोजन

नरकासुर स्पर्धेचे बांद्यात आयोजन

Published on

नरकासुर स्पर्धेचे
बांद्यात आयोजन
बांदाः दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील ‘आमचीवाडी देऊळवाडी’ यांच्या वतीने नरक चतुर्थीनिमित्त खुली व आमंत्रित नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबरला पिंपळेश्वर मंदिर बांदा येथे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम १५ हजार, द्वितीय १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. बांदा मर्यादित स्पर्धेअंतर्गत प्रथम क्रमांक ४,४४४ व द्वितीय क्रमांकांस २,२२२ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रमात दिवाळी स्पेशल लकी ड्रॉचेही आयोजन केले आहे. त्यात प्रथम रेफ्रिजरेटर, द्वितीय कुलर, तृतीय इलेक्ट्रिक गिझर ठेवले आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे येथील स्थानिक कलाकार प्रशांत सावंत विविध स्टॅच्यू साकारणार आहेत. अधिक माहितीसाठी आशिष सावंत, गौरांग साळगावकर, देवेश वारंग यांच्याशी संपर्क साधावा.
....................
स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे
बांद्यात किल्ले स्पर्धा
बांदाः येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील व खुल्या गटात होणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपये रोख तसेच स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर स्मृती सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ७०० रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी केदार कणबर्गी यांच्याकडे नावनोंदणी करावी. स्पर्धेचे परीक्षण चौथ्या आणि पाचव्या दिवशी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब यांनी केले आहे.
.....................
कृती समितीची
रविवारी बैठक
दोडामार्गः आडाळी एमआयडीसीतील भूखंड वाटप प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समितीने रविवारी (ता. १२) दुपारी ३ वाजता सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील सरपंच, पत्रकार व उद्योजक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती सरपंच पराग गावकर व समिती सचिव प्रवीण गावकर यांनी दिली.
......................
कणकवलीत उद्या
डबलबारी सामना
कणकवलीः सर्वपित्री अमावस्येदिवशी गडनदी पुलावर झालेल्या अपघाती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळातर्फे शनिवारी (ता. ११) रात्री ९ वाजता तेलीआळी येथील डी.पी. रोडसमोर डबलबारीचा सामना आयोजित केला आहे. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ घोटगे-भरणी, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी-देवगडचे बुवा संतोष जोईल यांच्यात डबलबारी सामना होणार आहे. चव्हाण यांना तुषार लोट, शिवराज पोईपकर, तर जोईल यांना अक्षय मेस्त्री, मांगिरीश घाडी संगीत साथ देणार आहेत. भजनप्रेमींनी डबलबारीचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सुदर्शन मित्रमंडळातर्फे केले आहे.
.................
एसटी कर्मचाऱ्यांचा
आंदोलनाचा निर्धार
कणकवलीः एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत परिवहनमंत्री यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ७) मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्याने संयुक्त कृती समितीने १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करणारच, अशी भूमिका घेतल्याचे संयुक्त कृती समितीकडून सांगण्यात आले.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com