मनाचे श्लोक चित्रपटाचे नाव बदला

मनाचे श्लोक चित्रपटाचे नाव बदला

Published on

-rat९p२५.jpg-
P२५N९७५६३
रत्नागिरी ः निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते.

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदला
हिंदू जनजागृती समिती, समर्थ भक्तांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावाचा मराठी चित्रपटासाठी वापर करण्यास हिंदुत्ववादी संघटना व समर्थ भक्तांचा ठाम विरोध आहे. शुक्रवारी (ता. १०) प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या शीर्षकाचे मनाचे श्लोक हे नाव तत्काळ बदलावे अन्यथा हिंदू संतांचा अवमान कदापि सहन करणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वीकारले.
मनोरंजनासाठी कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि धर्मपरंपरेचा उपहास योग्य नाही. जर या चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर संतपरंपरेच्या सन्मानाच्या रक्षणार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी समर्थ भक्त आणि श्री देव गणपतीपुळे संस्थांचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर आणि डॉ. चैतन्य घनवटकर, हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, पांडुरंग पारले, शशिकांत जाधव, शैलेश बेर्डे, नितीन चेचरे, विष्णू बगाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com