कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष सन्मान
-rat९p९.jpg-
P२५N९७४९८
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे अथर्व आठल्ये, प्रथमेश तारळकर, विलास हर्षे आणि प्रसाद देवस्थळी यांचा विशेष सत्कार करताना संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर. सोबत उपाध्यक्ष मानस देसाई.
----
कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करा
माधव हिर्लेकर ः कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे विशेष सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : कला, क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कलाकार, खेळाडूंमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. हा आनंद साजरा करण्याकरिता या व्यक्तींचा विशेष सन्मान करत आहोत. अशाच प्रकारे कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले.
कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी उपाध्यक्ष मानस देसाई यांच्यासमवेत सत्कारमूर्ती उपस्थित होते. संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्काराचे मानकरी, प्रसिद्ध ऑर्गनवादक विलास हर्षे, संगीत अलंकार परीक्षेत तबलावादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी अथर्व आठल्ये, संगीत अलंकार परीक्षेत पखवाज वादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रथमेश तारळकर आणि जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन हा सन्मान हिर्लेकर यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना हर्षे म्हणाले की, रत्नागिरी ही कलाकारांची नगरी असल्याने येथेच स्थायिक झालो. मायबाप रसिक श्रोत्यांनी मला उत्स्फूर्तपणे स्वीकारले म्हणूनच कलाकार राहिलो. अथर्व म्हणाला की, शिपोशी, काटवली येथे पारंपरिक उत्सवात तबल्याची आवड निर्माण झाली आणि कलेला वाव मिळाला. आज जो काही आहे तो गुरू हेरंब जोगळेकर, विश्वनाथ शिरोडकर, प्रवीण करकरे यांच्यामुळेच. प्रथमेश म्हणाला, माझा खूप मोठा सांगीतिक परिवार आहे. गुरुजी परशुराम गुरव यांनी ज्या तळमळीने मला पखवाज शिकवला त्यांना मानाचा मुजरा. ते एसटीनेच प्रवास करतात; पण आडिवऱ्यात आल्यावर दोन किमी चालत शिकवण्यासाठी येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.