सेवावृत्ती जोपासत नैतिकतेचे पालन गरजेचे

सेवावृत्ती जोपासत नैतिकतेचे पालन गरजेचे

Published on

swt105.jpg
97730
सावंतवाडीः येथे ‘लेक्स डिस्कशन’मध्ये मार्गदर्शन करताना ॲड. राजेंद्र रावराणे.

सेवावृत्ती जोपासत नैतिकतेचे पालन गरजेचे
ॲड. राजेंद्र रावराणेः सावंतवाडीत ‘वकिलांची जबाबदारी आणि कायदे नियम’वर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः वकील हा एक उत्तम नट असतो, कारण त्याला कायद्यानेच नट बनवले आहे. वकिलांचा काळा युनिफॉर्म हे केवळ देखणेपणाचे प्रतीक नसून तो विद्वत्तेचा, आदराचा आणि जबाबदारीचा परिधान आहे. त्यामुळे वकिलांनी सेवावृत्ती जोपासत व्यावसायिक नैतिकतेचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले.
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात ‘वकिलांची जबाबदारी आणि कायदे नियम’ या विषयावर ॲड. रावराणे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
ॲड. रावराणे पुढे म्हणाले, “वकिलाकडे नम्रता, अभ्यासवृत्ती आणि सत्यशोधी वृत्ती असावी. ‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ ही वर्तणूकच आदर्श वकील घडवते. बार कौन्सिलचे नियम आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट १९६१ यांचे सखोल वाचन करून वकिलांनी जबाबदारीने वागावे. ज्येष्ठांचा आदर राखावा आणि पक्षकारांशी विश्वासाचे नाते निर्माण करावे.”
ते पुढे म्हणाले, “उत्तम वकील होण्यासाठी ब्रीफ आणि चार्जशीट काळजीपूर्वक वाचणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षकार हा वकिलाचा आरसा असतो. त्यांची गोपनीयता आणि नैतिक मूल्ये जपणे हे वकिलाचे पहिले कर्तव्य आहे. जेव्हा वकील विश्वास संपादन करतो आणि त्याच विश्वासाला पात्र ठरतो, तेव्हाच त्याची खरी ओळख निर्माण होते.”
यावेळी त्यांनी नांदोस हत्याकांड आणि श्रीधर नाईक खून प्रकरण यांसारख्या गाजलेल्या खटल्यांतील अनुभवही उपस्थितांशी शेअर केले. या कार्यक्रमात तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशूर यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करत, “चांगला वकील होण्यासाठी तब्येत चांगली ठेवावी, सतत अभ्यास करावा, कोर्टाशी व पक्षकारांशी प्रामाणिक राहावे,” असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर होते.
ॲड. स्वप्नील कोलगावकर यांनी प्रास्ताविक केले, ॲड. रत्नाकर गवस यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. रणशूर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com