रत्नागिरीत खल्वायनची आज संगीत सभा
रत्नागिरीत खल्वायनची
आज संगीत सभा
रत्नागिरीः खल्वायन संस्थेची ३१८वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गोदूताई जांभेकर विद्यालयात रंगणार आहे. संगीतसभेत ऐरोली-ठाणे येथील ज्येष्ठ गायिका ज्योती खरे-यादवार यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्ती, नाट्यगीतांचे सादरीकरण होणार आहे. १९८० ला गायनासाठी त्यांना केंद्रीय शिष्यवृत्ती तसेच सुलश्री प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती प्राप्त आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर सुमारे २८ वर्षे त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. कार्यक्रमाला हार्मोनियमसाथ ज्येष्ठ वादक पंडित प्रकाश चिटणीस, तबलासाथ हेरंब जोगळेकर करणार आहेत.
---------
सॉफ्टबॉल स्पर्धेत
दुहेरी विजय
संगमेश्वर ः जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले. जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध तालुक्यांमधील नामांकित शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. पालशेतकर विद्यालयाच्या दोन्ही संघांनी खेळातील शिस्त, संघभावना व तांत्रिक कौशल्य यांचा सुंदर संगम साधत प्रतिस्पर्ध्यांवर आपले वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. मुलींच्या संघाने निर्णायक फेरीत अप्रतिम खेळ सादर करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे प्रशिक्षक अतुल अशोक जाधव यांचे मार्गदर्शन, तसेच मुख्याध्यापक रमेश बोलभट यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
--------
कसबा हायस्कूलचे
खो-खो स्पर्धेत यश
संगमेश्वरः डेरवण येथे झालेल्या १९ वर्ष वयोगट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या मुलांच्या संघाने सर्व सामने जिंकून जिल्हास्तरीय स्पर्धेवर वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे या संघाची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. खो-खो संघातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष कॅ. अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सहसचिव शौकतअली खलफे आदींनी अभिनंदन केले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.