वेंगुर्ले येथे आज आरक्षण सोडत

वेंगुर्ले येथे आज आरक्षण सोडत

Published on

वेंगुर्ले येथे आज
आरक्षण सोडत
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ साठी आरक्षण कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. यासाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव जागा निश्चित करण्यासाठी पंचायत समिती निर्वाचक गण राखीव जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी वेंगुर्ले तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.
----
कुडाळ पंचायत समिती
सदस्यपद सोडत उद्या
कुडाळ ः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्यपदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत सोमवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय येथे काढण्यात येणार आहे. कुडाळ पंचायत समिती सदस्यपदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने होणार आहे. या सोडतसाठी संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.
----
आजगाव येथे
नरकासुर स्पर्धा
आरोंदा ः आजगाव शिवशक्ती मित्रमंडळातर्फे रविवारी (ता. १९) दुपारी ३.३० ते ६ या वेळेत नरकासुर स्पर्धेचे आयोजन आजगाव (वाघबीळ मैदान) येथे केले आहे. ही स्पर्धा खुला गट व सावंतवाडी तालुका मर्यादित अशा दोन गटांत होणार आहे. खुल्या गटासाठी प्रथम ७०००, द्वितीय ५०००, तृतीय ३००० रुपये तसेच सावंतवाडी मर्यादित स्पर्धेसाठी ३३३३, २२२२ व ११११ रुपये अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गिरीश परब, ओंकार गोवेकर, कुणाल वाटजी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवशक्ती मित्रमंडळाने केले आहे.
.................
वृक्षारोपण मोहिमेस
अणसूरला प्रतिसाद
वेंगुर्ले ः अणसूर कार्यक्षेत्रात ‘माझी वसुधंरा’ या अभियानांतर्गत २५० झाडे लावली आहेत. या अभियानाचा प्रारंभ अणसूर ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, साक्षी गावडे, संयमी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, सुधाकर गावडे, अनुष्का तेंडोलकर, अनिषा गावडे, अन्नपूर्णा गावडे आणि अंकुश तेंडोलकर उपस्थित होते.
.....................
ओटवणेत रविवारी
नरकासूर स्पर्धा
ओटवणे ः गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळातर्फे रविवारी (ता. १९) रात्री १० वाजता ओटवणे क्र. १ नजीक दशक्रोशी मर्यादित नरकासूर स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारिवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com