सावंतवाडी आयटीआयमध्ये अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू

सावंतवाडी आयटीआयमध्ये अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू

Published on

97940

सावंतवाडी आयटीआयमध्ये
अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू

सावंतवाडी, ता. ११ ः येथील जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शॉर्ट टर्म कोर्सेसचे ऑनलाईन पद्धतीने उद्‍घाटन करण्यात आले. सावंतवाडीसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी हे अभ्यासक्रम रोजगार निर्मितीसाठी मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी येथील फर्नांडिस वुडन आर्टचे प्रोप्रायटर अँड्र्यू फर्नांडिस, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, आयटीआयचे उपप्राचार्य नीलेश ठाकूर, गटनिदेशिका सुचिता नाईक, आयएमसी सदस्य संतोष तेली, श्री. सातपुते आदी उपस्थित होते.
‘उद्योग ४.०’ च्या बदलत्या युगात तांत्रिक कौशल्ये आत्मसात केलेल्या मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला अनुरूप कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी राज्याने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे (शॉर्ट टर्म) अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील औद्योगिक संस्थेत शॉर्ट टर्म कोर्सेसचे उद्‍घाटन करण्यात आले. संस्थेतील सर्व कर्मचारी वृंदाने या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

Marathi News Esakal
www.esakal.com