आता लवकरच ‘कॉलेज तेथे दाखला’!

आता लवकरच ‘कॉलेज तेथे दाखला’!

Published on

97950


आता लवकरच ‘कॉलेज तेथे दाखला’

तहसीलदार श्रीधर पाटील; ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमात सावंतवाडीची आघाडी


सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. ११ ः ​सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्याने ‘शाळा तेथे दाखले’ या उपक्रमात आघाडी घेत जवळपास १०,१७० दाखल्यांचे वितरण केले आहे. यापुढे ‘कॉलेज तेथे दाखला’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
​येथील तहसीलदार कार्यालयातर्फे ‘सेवा पंधरावडा’ उपक्रमाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये महा-ई-सेवा केंद्राद्वारे तालुक्यात जवळपास साडेदहा हजार दाखल्यांचे वितरण केले आहे. आज कलंबिस्त हायस्कूलमध्ये ५०० विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ​यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले, ‘जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कार्यभार हाती घेताच विद्यार्थ्यांना थेट शाळेत दाखले देण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. महसूल विभागामार्फत वैद्यकीय दाखला अवघ्या एका तासात उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही केली आहे.’ दरम्यान, महा-ई-सेवा केंद्राचे संचालक प्रमोद नाईक यांचे सुमारे दोन हजार दाखले वेळेत तयार केल्याबद्दल कौतुक करण्यात आले. ​या कार्यक्रमाला कलंबिस्त हायस्कूलचे संचालक सुनील राऊळ, ॲड. संतोष सावंत, मंडल अधिकारी भारती गोरे, प्रमोद नाईक, मुख्याध्यापक अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
---
दिवाळी सुटीत एक तरी पुस्तक वाचा!
श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह खो-खो, ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शाळेत जे शिकवले जाते, तेच योग्य पद्धतीने शिकले पाहिजे. ते तुमच्या जीवनाला कलाटणी देईल, असे ते म्हणाले. येत्या दिवाळी सुटीत ग्रंथालयातील एक तरी पुस्तक वाचावे आणि त्या आधारावर निबंध लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड. संतोष सावंत यांनी, वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तरी पुस्तक वाचावे. हा उपक्रम आता शाळांमध्ये आयोजित केला जाईल आणि त्याची सुरुवात येथून होत आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com