रत्नागिरी-काताळे ग्रामपंचायतीत पौष्टिक पदार्थ स्पर्धा
rat11p14.jpg
97951
गुहागरः काताळे ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी पौष्टिक पदार्थ स्पर्धेचे आयोजन केले.
--------------
काताळे ग्रामपंचायतीत
पौष्टिक पदार्थ स्पर्धा
रत्नागिरी, ता. १२ : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम झाले. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने ‘राष्ट्रीय पोषण महिना’ या अनुषंगाने अंगणवाडी सेविका छाया सुर्वे यांनी महिलांसाठी पौष्टिक पदार्थ स्पर्धेचे आयोजन केले होते.
लहान मुला-मुलींच्या आहारात कोणते पदार्थ आवश्यक आहेत, कोणत्या पदार्थाचे सेवन टाळावे, याबाबत माता पालकांना मार्गदर्शन केले. शिवाय, अंगणवाडीत मुलांसाठी आलेला ‘टीएचआर’चे विविध उपयोग पालकांना समजावून सांगितले. तवसाळ उपकेंद्राच्या किल्लेकर यांनी ‘एचपीव्ही’ लस मुलींना देणे किती लाभदायक आहे, स्त्रियांना होणाऱ्या गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंध म्हणून ही लस देणे अत्यावश्यक आहे. सर्व अंगणवाडी सेविका, आशासेविका यांनी माता पालकांना लस आवश्यक असल्याचे पटवून दिले. सरपंच प्रियांका सुर्वे, अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, आर्या रसाळ, रितिका अजगोलकर, येद्रे, फरिदा जांभारकर आदी उपस्थित होते.