दापोली-दापोली शाखेच्या अध्यक्षपदी रमेश कडू

दापोली-दापोली शाखेच्या अध्यक्षपदी रमेश कडू

Published on

अखिल भजन हितवर्धक मंडळाच्या
दापोली शाखेच्या अध्यक्षपदी कडू
दापोली, ता. १३ः अखिल भजन हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याची दापोली तालुक्यामध्ये शाखा व कोअर कमिटी असावी या उद्देशाने दापोली तालुक्यातील भजनी कलावंतांची सभा जालगाव येथील श्रीशैल सभागृहात झाली. सभेला दापोली तालुक्यातील भजन मंडळाचे बुवा, पखवाज वादक, चकवा वादक, साथीदार मंडळी उपस्थित होते.
अखिल भजन हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याची दापोली तालुक्यामध्ये शाखा असावी असे ठरवून दापोली तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रमेश कडू, कार्याध्यक्ष गजानन बेलोसे, उपाध्यक्ष श्रीधर विचारे, सचिव दिनेश बतावळे, सहसचिव जीवन गुहागरकर, खजिनदार विनय गोलांबडे, तर जिल्हा संपर्क प्रतिनिधी म्हणून मंदार जाधव आणि विजय भारदे यांची एकमताने निवड करण्यात आली. भजन परंपरा जपणे करता तसेच भजनी कलावंतांना मानधन मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्यासाठी दापोली तालुक्यामध्ये अशा प्रकारचे मंडळ स्थापन झाल्याबाबत तालुक्यातील भजन कलावंत व भजन रसिकांकड व्यक्त करण्यात येत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com