रत्नागिरी-''सेरेब्रल पाल्सी'' या आजारावर जागरुकता कार्यक्रम

रत्नागिरी-''सेरेब्रल पाल्सी'' या आजारावर जागरुकता कार्यक्रम

Published on

rat12p7.jpg-
98068
रत्नागिरी ः मुकुल माधव फाउंडेशन व जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे सेरेब्रल पाल्सी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पटवर्धन.
-------------

‘सेरेब्रल पाल्सी’ आजारावर
जागरुकता कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १४ ः येथील मुकुल माधव फाउंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे ‘सेरेब्रल पाल्सी’ या लहान मुलांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन व जागरुकता कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात झाला.
सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. लीना श्रीवास्तव, सलोनी राजे यांनी सेरेब्रल पाल्सी आजाराच्या निदान व उपचारांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, डॉ. अर्जुन सुतार, मुकुल माधव फाउंडेशनचे डॉ. अनुप करमरकर, अभिजित साळवी, बबलू मोकळे उपस्थित होते. सेरेब्रल पाल्सी या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे हालचाल आणि समन्वयातील अडचणी, याव्यतिरिक्त बोलणे, गिळणे, खाणे, झोपणे किंवा डोळे नियंत्रित करणे यांसारख्या कार्यांमध्ये अडचणी येतात. तसेच काही प्रकारांमध्ये झटके आणि मानसिक आरोग्याच्या समस्या दिसून येतात.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘डीईआयसी’ विभागात विशेषज्ञांकडून विविध प्रकारच्या शून्य ते ६ या वयोगटातील मुलांच्या जन्मतः होणाऱ्या आजाराचे वेळीच निदान करून पुढील (शस्त्रक्रिया किंवा थेरपी) उपचारांसाठी बालकांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. ‘डीईआयसी’ विभागात दिल्या जाणाऱ्या या सेवांचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजवंतांनी अवश्य लाभ घ्यावा, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com