...हा तर शेतकऱ्यांचा अपमान

...हा तर शेतकऱ्यांचा अपमान

Published on

98257

...हा तर शेतकऱ्यांचा अपमान

इर्शाद शेख ः सहकारमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी सर्वांत कठीण काळातून जात आहे. वारंवार होणारे पावसाचे अनियमित चक्र, वाढता उत्पादन खर्च, बाजारात योग्य भाव न मिळणे आणि कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आयुष्य ही शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती आहे. अशात शेतकऱ्यांबाबत वक्तव्य करणे फार चुकीचे आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.
शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘‘सत्ताधारी पक्षाचे सहकार मंत्री पाटील यांनी ‘शेतकऱ्यांना, कर्जमाफीचा नाद लागलाय आणि आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासन देतो, पण काय मागणी करायची हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे’ अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी टवाळी करणारे हे वक्तव्य म्हणजे ते शासनाच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट उदाहरण आहे. अशा शब्दांनी शेतकऱ्यांची केवळ खिल्ली उडवली जात नाही, तर त्यांच्या संघर्षाचा अपमान होतो. शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारची चुकीची धोरणे. उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतीसाठी लागणारी वीज, खतांचे भाव आणि बियाण्यांचे दर आभाळाला भिडले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाईच्या केवळ घोषणा होतात. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले जाते.
शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीला जबाबदार असलेले सरकार आणि त्यांचे मंत्री आता शेतकऱ्यांनाच दोष देतात, हे अत्यंत संतापजनक आहे. हे वक्तव्य हे जनतेच्या विश्वासाचा संपूर्ण विश्वासघात आहे. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी, भरघोस मदत, शेतीला हमीभाव, रोजगार यांची आश्वासने देऊन मत मागितले जातात. परंतु, सत्तेवर आल्यानंतर ती आश्वासने पूर्ण करण्याऐवजी अशी असंवेदनशील वक्तव्य केली जातात. करताना या मंत्र्यांना लाज सुद्धा मंत्री स्वतः कबूल करतात की ती आश्वासने ‘फक्त निवडणुकीसाठी होती’. हा स्वीकार म्हणजे जनतेची फसवणूक, शेतकऱ्यांचा आणि लोकशाहीचा अपमान करणारी कबुली आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे.’’
-----------------
पाटलांची हकालपट्टी करा!
काँग्रेस पक्ष अशा असंवेदनशील आणि शेतकरीविरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. सहकार मंत्री पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी आहे. जर सरकारने या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले, तर काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन उभारेल आणि शेतकऱ्यांचा आवाज रस्त्यावर उतरवेल. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पुढेही राहील. शेतकऱ्यांना न्याय, कर्जमाफी, हमीभाव आणि सन्मानपूर्वक जीवन मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा लढा सुरू राहील, असे श्री. शेख यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com