गुरामवाडी, नांदोससह वराडचे ठाकरेंचे पदाधिकारी शिंदे सेनेत
98258
गुरामवाडी, नांदोससह वराडचे
ठाकरेंचे पदाधिकारी शिंदे सेनेत
मालवण, ता. १३ : आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेना उपतालुका प्रमुख गुरामवाडी येथील जिल्हा परिषद माजी सभापती बाळ महाभोज यांसह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले.
आमदार राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन व गाव विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेनेत पक्ष करत असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, संतोष साटविलकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर जिल्हा परिषद विभाग प्रमुख राजन माणगावकर, वराड शिवसेना गावप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, संतोष पालव, महेश बागवे, सुशांत घाडीगावकर, दिलीप बिरमोळे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, शानू वालावलकर आदी उपस्थित होते. ठाकरे शिवसेना उपतालुका प्रमुख कट्टा गुरामवाडी येथील जिल्हापरिषद माजी सभापती बाळ महाभोज, राजेंद्र कांबळी, प्रमोद कांबळी, राधाकृष्ण महाभोज, बाबू मालवणकर, दिपक गुराम, साबाजी गुराम, अक्षय गुराम, ओंकार लाड, नांदोस गडकरवाडी माजी शाखा प्रमुख सुभाष ठोंबरे, चंद्रकांत कोंडसकर, सुभाष घावरे, विनोद पार्टे, संजय मिठबावकर, प्रकाश खोत, मुकुंद भोसले, तेजस हरचांदे, जनार्दन भोसले, शशिकांत पार्टे, अविनाश पार्टे, अरुण इंदूलकर, सुरेश इंदूलकर, वराड शाखाप्रमुख किशोर भगत, आप्पा आळवे, मोहन आळवे, नितीन नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.