सावंतवाडीत आज कोजागरी कवी संमेलन
सावंतवाडीत आज
कोजागरी कवी संमेलन
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी कवी संमेलन २०२५ ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक डॉ. शरयू आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. १४) आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या कविवर्य केशवसुत सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या संमेलनासाठी कवयित्री डॉ. सई लळीत, साहित्य अकादमी प्राप्त ज्येष्ठ कवी, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. नवोदित कवींनी सहभागासाठी विठ्ठल कदम, मनोहर परब यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी कवींपैकी एक कवीच्या उत्कृष्ट कवितेला कवी वसंत सावंत सन्मान दिला जाणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, कार्यवाह मनोहर परब यांनी केले आहे.
---
कुडाळात आज
‘पदविका प्रदान’
कुडाळ ः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या येथील बॅ. नाथ पै बी.एड्. कॉलेज या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमापैकी योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम, एम.ए. योगा, एम.ए. शिक्षणशास्त्र, शालेय व्यवस्थापन पदविका, बहिस्थ बी.एस्सी. हे शिक्षणक्रम सुरू केले आहेत. केंद्रांमधील योगशिक्षक पदविका शिक्षणक्रमाच्या २०२३-२४ च्या बॅचचा पदविका प्रदान कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. १४) दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित केला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली पदविका प्रमाणपत्र स्वीकारावीत, असे आवाहन केंद्रप्रमुख परेश धावडे व केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.
...................
आडेलीत महिलांना
व्यवसायाचे धडे
वेंगुर्ले ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या भरारी महिला प्रभाग संघ आडेलीची वार्षिक सर्वसाधारण सभा वेतोरे येथील साई योगेश्वरी मंगल कार्यालयात झाली. या सभेला सुमारे २०० महिला उपस्थित होत्या. आडेली प्रभागात २५० समूह असून त्यात २ हजार ६०० महिला कार्यरत आहेत. या महिलांना रोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांमधून कर्जे वाटप केली जातात. तसेच आता उमेदचा ऑनलाईन मार्ट अॅप तयार केला असून यामार्फत बिगर शेतीवर आधारित व्यवसायातून पदार्थ तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावेल यांनी दिली. तसेच विविध योजनांबाबत आणि रोजगाराबाबत महिलांना मार्गदर्शन केले.
..................
वेतोरेत २५ ला
वेशभूषा स्पर्धा
वेंगुर्ले ः आडेली-भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम बागलकर यांच्यातर्फे २५ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता श्री सोमेश्वर मंदिर वेतोरे खांबडवाडी येथे वेंगुर्ले तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १० ते १६ वर्षांचा वयोगट आणि १७ वर्षांवरील वयोगट अशा दोन गटात होणार आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख रुपयांची पारितोषिके व चषक तर एक उत्तेजनार्थ क्रमांकास रोख रुकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी भूमिकेबद्दल दीड मिनिटे वेषभूषेचे वर्णन करावयाचे आहे. दशावतारी वेशभूषा नसावी, असे आवाहन उत्तम नाईक यांनी केले आहे.
..................
मळगावात २२ ला
डबलबारी भजन
सावंतवाडी ः अष्टविनायक कला क्रीडा मंडळ, मळगाव रस्तावाडी आयोजित सांजपाडवानिमित्त मळगाव हायस्कूल पटांगणावर २२ ला सायंकाळी ७ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. यामध्ये श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ, देवगड बुवा संदीप लोके (पखवाज साथ-योगेश सामंत, तबला-संदेश सुतार) विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे कुडाळ बुवा गुंडू सावंत (पखवाज साथ-विराज बावकर, तबला-संकेत गोसावी) यांना साथ करणार आहेत.
........................
मठ शाळेमध्ये
संगणक कक्ष
वेंगुर्ले ः आधुनिक युगात विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे तांत्रिक ज्ञान मिळावे व डिजिटल साक्षरता वाढावी, या उद्देशाने हा संगणक कक्ष सुरू केला आहे. या उपक्रमाबद्दल शाळेच्या प्रशासनाचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी याचा प्रामाणिकपणे लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख महोदव आव्हाड यांनी संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी केले. मठ शाळा क्र. २ येथे नुकतेच संगणक कक्षाचे उद्घाटन केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांच्या हस्ते झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.