मालवणात तालुक्यात दिसणार ''महिलाराज''
98327
मालवण तालुक्यात
दिसणार ‘महिलाराज’
पंचायत समितीचे आरक्षण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समितीच्या १२ गणांची आरक्षण सोडत कार्यक्रम आज पार पडला. यात सहा जागांवर महिलाराज दिसून येणार आहे.
येथील पंचायत समितीच्या १२ गणांसाठीची आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात भूसंपादन जिल्हाधिकारी शुभदा पोवार, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी माजी उपसभापती अशोक बागवे, चौके सरपंच पी. के. चौकेकर, देवानंद लुडबे, दत्ता पोईपकर, संजय पाताडे, विरेश पवार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी श्रीनिका निखिल नागवेकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार प्रिया हर्णे, विनायक जांभेकर, एन. ए. प्रभुदेसाई, महसूल सहायक एम. जी. गवस, आनंद तोंडवळकर आदी उपस्थित होते.
----------
आरक्षण असे
*अनुसूचित जाती महिला - पेंडूर
*नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - कोळंब, कुंभारमाठ
*नागरिकांचा मागास प्रवर्ग - शिरवंडे,
*सर्वसाधारण महिला- आडवली-मालडी, पोईप, वराड
*सर्वसाधारण - चिंदर, आचरा, मसुरे-मर्डे, वायरी भूतनाथ, सुकळवाड