रत्नागिरी-टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा
आयटीआयमध्ये
समुपदेशन फेरी
रत्नागिरी : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय प्रवेशाच्या समुपदेशन फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आयोजित केली आहे. या फेरीसाठी पात्र उमेदवारांनी १६ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत संस्थेत सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळवले आहे. या फेरीकरिता यापूर्वी ज्यांनी आयटीआय येथे अर्ज भरलेले आहेत, ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत त्यांच्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंत नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गटनिदेशक सी. आर. शिंदे, गटनिदेशक पी. जी. कांबळे, शिल्पनिदेशक एस. जे. पावसकर यांच्याशी संपर्क साधावा.
---------
सैनिक कल्याण
कार्यालयात भरती
रत्नागिरी ः सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक गट क मधील ७२ पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना वेबबेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ५ नोव्हेंबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळवले आहे. ७२ पैकी १ पद हे अपंग संवर्गातील किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून भरण्यात येणार आहे. ही भरतीप्रक्रिया टीसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार असून, परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
---------
एनसीसी कॅडेटसाठी
१० पासून शिबिर
रत्नागिरीः नेव्हल नॅशनल कॅडेट कोअरसाठी १० ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर महाराष्ट्र संचालनालयाच्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती लेफ्टनंट कमांडर रमनजुल दीक्षित यांनी दिली. या शिबिरात ६० कॅडेट्स, २ भारतीय नौदल अधिकारी, ९ नेव्ही सेलर स्टाफ, ३ एएनओ (२ महिला एएनओ आणि १ पुरुष एएनओ) आणि ५ नागरी कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. या शिबिरातील विद्यार्थी रत्नागिरी ते विजयदुर्ग आणि परत या मार्गावर डीके व्हेलर बोटीने विविध बंदरांवरून प्रवास करतील. एकूण तीन डीके व्हेलर बोटी असतील, ज्या कॅडेट्स चालवतील. या बोटींना दोन भाड्याच्या बचावबोटी (यांत्रिक) आणि एक सेफ्टी बोट (यांत्रिक) सहाय्य करणार आहे, ज्या संपूर्ण प्रवासात सोबत राहतील. सर्व बोटी एकत्र प्रवास करतील. १० नोव्हेंबरला रत्नागिरी ते रनपार, ११ ला रनपार ते पूर्णगड, १२ ला पूर्णगड ते जैतापूर, १३ ला जैतापूर ते विजयदुर्ग, १४ ला विजयदुर्ग ते देवगड, १५ ला देवगड ते विजयदुर्ग, १६ ला विजयदुर्ग ते जैतापूर, १७ ला जैतापूर ते पूर्णगड, १८ ला पूर्णगड ते रनपार, १९ ला रनपार ते रत्नागिरी असा प्रवास होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.