हस्ताक्षर लेखन स्पर्धेत मृणाली नार्वेकर प्रथम

हस्ताक्षर लेखन स्पर्धेत मृणाली नार्वेकर प्रथम
Published on

हस्ताक्षर लेखन स्पर्धेत
मृणाली नार्वेकर प्रथम
लांजाः शहरातील बागेश्री शाळेत लोकमान्य वाचनालय, लांजा यांच्यातर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत मृणाली नार्वेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. अंकिता आग्रे द्वितीय, मृणाल मेस्री हिला तृतीय देण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ क्र. भूमी रसाळ हिने मिळवला. यशस्वी स्पर्धकांना पुस्तक स्वरुपात बक्षीस, प्रशस्तिपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. लोकमान्य वाचनालयातर्फे अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि आधुनिक कवितेचे शिल्पकार कविवर्य केशवसुत यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा, लांजा बागेश्रीमध्ये तिसरी ते चौथीमधील विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन केले. या वेळी लोकमान्य वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विनोद बेनकर, मुख्याध्यापिका सविता पाटील, सहशिक्षिका नंदिनी पेडणेकर-पाटोळे, सहाय्यक ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर, शुभम नागवेकर आदी उपस्थित होते.
------
अनंत करजवकर यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
खेड ः दापोली येथील रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनतर्फे घेरापालगडचे शिक्षक अनंत करजवकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरणावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय खटके, राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील, पर्यटन विभाग कोकण अध्यक्ष बाळासाहेब नकाते, कार्याध्यक्ष संजय खटके, राज्य प्रसिद्धिप्रमुख गोविंद राठोड यांच्यासह राज्यभरातील मान्यवर व पुरस्कार विजेते उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आत्मविश्वास देणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी झटणे आणि ते शिकवत असलेल्या विविध विषयात आकर्षण निर्माण करणे, याबद्दल करजवकर यांचा हातखंडा आहे. त्यांनी ग्रामीण भागातील गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना प्रेरित करणे, यासाठी त्यांनी ग्रामीण भागात मेहनत घेतली आहे. या कार्याची दखल घेऊन करजवकर यांना पुरस्कार देण्यात आला.

----------
पाककृती स्पर्धेत
फरविन मुलाणी प्रथम
लांजा ः येथील लोकमान्य वाचनालयातर्फे लांजा तालुका मर्यादित महिलांसाठी साहित्यिक पाककृती स्पर्धा लांजा येथे झाली. लांजा पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विनोद बेनकर, संचालिका विजयालक्ष्मी देवगोजी, ललिता भिंगे उपस्थित होत्या. या वेळी शीला केतकर, संचालिका विजयालक्ष्मी देवगोजी यांनी महिला जगतावर विविध कवितांचे सादरीकरण केले. त्यानंतर साहित्यिक पाककृती स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत तालुक्यातील महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत फरविन मुलाणी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मुग्धा चांदोरकर, तृतीय क्रमांक संपदा पालकर आणि उत्तेजनार्थ क्रमांक विजया तोडकरी यांनी मिळवला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आले.

-----------

निकम विद्यालयात
वाचन प्रेरणा दिन
सावर्डे ः माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. खुशबू माळी हिने सूत्रसंचालन केले. स्वरा धावडे हिने पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले. शिल्पा राजे-शिर्के यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले. निधी राडे हिने आभार मानले. समृद्धी कदम, ग्रंथपाल अनुष्का काजरोळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com