आरोंदा येथे रविवारी खुली नरकासुर स्पर्धा
आरोंदा येथे रविवारी
खुली नरकासुर स्पर्धा
आरोंदा ः आरोंदा श्री देव राष्ट्रोळी कला, क्रीडा मंडळ देऊळवाडीतर्फे येथे रविवारी (ता. १९) श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिरानजीक खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत होणार आहे. ही स्पर्धा ट्रिकसीन व नॉनट्रिकसीन अशा दोन गटांत होईल. ट्रिकसीन नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम १२,२२२, द्वितीय ९९९९, (ॲड. मनोज आरोंदेकर पुरस्कृत) व तृतीय ७७७७ रुपये (श्री देव राष्ट्रोळी कला, क्रीडा मंडळ देऊळवाडी आरोंदा पुरस्कृत), तर नॉनट्रिकसीन स्पर्धेसाठी ६६६६ (ऋषिकेश नाईक पुरस्कृत), ४४४४ (ललित नाईक पुरस्कृत) व तृतीय २२२२ रुपये (ऋषिकेश नाईक पुरस्कृत), तसेच चषक व सन्मानचिन्ह (ॲड. मनोज आरोंदेकर पुरस्कृत) देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संकेत नाईक, मंदार नाईक, दीप आरोंदेकर यांच्याशी संपर्क साधावा.
....................
मठ उपसरपंचपदी
मठकर बिनविरोध
वेंगुर्ले ः तालुक्यातील मठ उपसरपंचपदी भाजपच्या सोनिया मठकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच रुपाली नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यासी अधिकारी विकास केळुसकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात ही प्रक्रिया झाली. भाजपचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू परब यांनी त्यांचे अभिनंदन केले. उपसरपंच संतोष वायंगणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी ही निवड झाली. ग्रामपंचायत सदस्य सिद्धी गावडे, शमिका मठकर, शक्ती केंद्रप्रमुख विजय बोवलेकर, अध्यक्ष अनिल तेंडोलकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, बबन परब, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन मनोहर मठकर, उमेश मठकर, स्वप्नील मठकर, दामू मठकर, राकेश मठकर, सुरेश मठकर, रवींद्र खानोलकर, अजित नाईक, हेमंत वडे, मिलिंद मठकर, दत्तप्रसाद मठकर, रवींद्र मठकर, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा आदी उपस्थित होते.
......................
कणकवली येथे
नरकासुर स्पर्धा
कणकवली ः मित्रमंडळातर्फे रविवारी (ता. १९) रात्री ९ वाजता डी. पी. रोड, तेली आळी येथे नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे १३,०१३ रुपये, ९,००९ रुपये, ५००५ रुपये व चषक, चार उत्तेजनार्थ प्रत्येकी १,५१५ रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. सहभागी होणाऱ्या संघांनी नरकासुर प्रतिकृतीबरोबर श्रीकृष्ण वेशभूषा केलेले पात्र आणणे बंधनकारक आहे. अधिकाधिक संघांनी सहभागी व्हावे. सोनू भंडारी, गौरव हर्णे, बाबा डिचोलकर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.