त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा, साहिल ठाकरे प्रथम

त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा, साहिल ठाकरे प्रथम

Published on

- rat१५p४.jpg-
२५N९८६५३
चिपळूण : पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत केरू ठाकरे याला गौरवताना उमेश सकपाळ, भाऊ काडदरे, मंगेश पेढामकर आदी.

त्रिमूर्ती चित्रशाळा, साहिल ठाकरे प्रथम
चिपळूण नगरपालिक ; गणेश मूर्तीकार, सजावट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : चिपळूण नगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तिकार स्पर्धेत त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेला तर, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरगुती सजावट स्पर्धेत साहिल ठाकरे यांचा प्रथम क्रमांक देऊन गौरव करण्यात आला.
पारितोषिक वितरण कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झाला. या कार्यक्रमाची सुरुवात नृत्यमल्हार कथ्थक अॅकॅडमीच्या कोमल राणे यांनी सादर केलेल्या गणेशवंदनाने झाली. कार्यक्रमाला मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, दीपा देवळेकर, सुनील खेडेकर, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, रसिका देवळेकर, सीमा चाळके यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तिकार स्पर्धेत त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेला प्रथम क्रमांक तर विजय सागवेकरला (शंकरवाडी) द्वितीय आणि ओमकला केंद्राला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरगुती सजावट स्पर्धेत साहिल ठाकरेला प्रथम क्रमांक, अक्षय आग्रे द्वितीय आणि प्रणित गोरिवलेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांचा गौरव करण्यात आला आहे तसेच वंदेश चव्हाण, वैभव चव्हाण आणि सुनील खेडेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com