डॉ. तेंडोलकर देणार सावंतवाडी रुग्णालयात सेवा

डॉ. तेंडोलकर देणार सावंतवाडी रुग्णालयात सेवा

Published on

swt173.jpg
99180
सावंतवाडीः येथील उपजिल्हा रुग्णालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे. डावीकडून रवी जाधव, ॲड. अनिल निरवडेकर, डॉ. शंतनू तेंडोलकर.

डॉ. तेंडोलकर देणार सावंतवाडी रुग्णालयात सेवा
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळेः ॲड. निरवडेकरांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, विशाल परबांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयनची कमतरता लक्षात घेता येत्या दोन दिवसांत याठिकाणी डॉ. शंतनू तेंडोलकर हे सामाजिक भान ठेवून आपल्या वेळेनुसार सेवा देणार आहेत. दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजीशीयन असणार आहे. यासाठी ॲड. अनिल निरवडेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, युवा नेते विशाल परब यांचे सहकार्य लाभले आहे. डॉ. तेंडोलकर यांसह तीन खासगी परिचारिका आयसीयू युनीटमध्ये सेवा देणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेस डॉ. तेंडोलकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ॲड. निरवडेकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य रवी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. ऐवळे म्हणाले, "डायलेसीस युनीटसाठी डॉ. तेंडोलकर गेली १० वर्ष रूग्णालयात सेवा देत आहेत. आजची फिजीशीयन अभावी परिस्थिती बघता त्यांना आपण विनंती केली होती. यासंदर्भात ॲड. निरवडेकर यांच्या माध्यमातून भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली होती. यातून मार्ग काढण्याची सुचना त्यांनी केली होती. यातूनच डॉ. तेंडोलकर यांचे नाव समोर आले. त्यांना आपण विनंती केली असता डायलेसीस सोबत ही सेवा देण्यास तयार झाले आहेत. यासाठी ॲड. निरवडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. डॉ. तेंडोलकर यांच्यासह अन्य तीन परिचारिका याठिकाणी आयसीयू युनीटमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या मानधनाचा खर्च रविंद्र चव्हाण, विशाल परब व ॲड. निरवडेकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केला जाणार आहे. त्यांच्या नावे बँक खाते सुरू करून तेथून मानधन संबंधितांना दिले जाणार आहे. तसेच अभिनव फाउंडेशनन जनहित याचिका दाखल केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. खंडपीठ शासनाला निर्णय देईलच. देव्या सुर्याजी व रवी जाधव यांनी येथील समस्यांना गती देण्याच काम केलं.’’
ॲड. निरवडेकर म्हणाले, ‘‘उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयन नसल्याने रुग्णांची होणारी परवड पाहता सामाजिक उपक्रमातून आम्ही हा पुढाकार घेतला आहे. यामागे कोणतेही राजकारण वा स्वार्थ नाही. किंवा कोणत्याही पक्ष वा व्यक्तीला टार्गेट करण्याचा हेतू नाही. मी यासंदर्भात एक सावंतवाडीकर म्हणून श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सुचनेनुसार हे काम करत आहोत. या कामामध्ये कोणीही राजकारण न पाहता सामाजिक बांधिलकी ठेऊन पुढे यावे, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, राजकीय नेत्यांनी आर्थिक स्वरूपात हातभार लावावा.’’
डॉ. तेंडोलकर म्हणाले, ‘‘केवळ सामाजिक भान व इथली परिस्थिती पाहता अधिक्षक डॉ. ऐवळे व ॲड. निरवडेकर यांच्या विनंतीवरून ही सेवा देणार आहे. परंतु, हे करत असताना माझ्या खासगी हॉस्पिटल वा येथील रूग्णांकडे दुर्लक्ष करणार नाही‌. माझ्या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यानंतर वेळेनुसार डायलेसीस रुग्णांना सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात येणार त्यावेळी इतर सर्व रुग्णांचीही तपासणी करणार आहे. कुठल्याही प्रकारे बांधील नसणार. मात्र, रेफर होणारे रुग्ण कमी व्हावेत यासाठी माझे प्रयत्न राहतील. दोन ऑन कॉल डॉक्टरांच्या व्यतिरिक्त मी तिसरा फिजीशीयन म्हणून येथे १०० टक्के सेवा देईन.’’

चौकट
आजही तशीच परिस्थिती
१९९५ ते १९९९ पर्यंत मी इथे सेवा दिली. त्यावेळी सर्व स्पेशालिस्ट इथे होते. ३० वर्ष मी सेवेत असून खासगी रूग्णालयातून ऑफर असतानाही मी त्याचा विचार केलेला नाही. उपजिल्हा रुग्णालय सोडण्याचं कारण मनस्ताप हा होता. आजही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी यासाठी होकार दिला आहे. ही मनोवृत्ती बदलली पाहिजे, असे डॉ. तेंडोलकर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com