-तेरा लाखांचे नुकसान, मदतीत काटकसर
-Rat१७p११.jpg-
२५N९९१६८
मंडणगड : अतिवृष्टीत घर, गोठ्यांचे नुकसान झाले. आता जंगली श्वापदांपासून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
------------
अतिवृष्टीने मंडणगडला आर्थिक फटका
नुकसान १३.९२ लाखांचे; मात्र ५.३७ लाखांचीच मदत
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः अतिवृष्टीमुळे मंडणगड तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तालुका प्रशासनाने सादर केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १३.९२ लाखांचे नुकसान नोंदवले गेले. अतिवृष्टीमुळे घरे, गोठे, जनावरे आणि शेती नुकसानापोटी एकूण ५.३७ लाखांचे अनुदाने तालुक्यात वाटप करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
यावर्षी १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या एक घराचे १.५० लाख नुकसान झाले होते. त्यांना १.२० लाख नुकसान भरपाई देण्यात आली. अंशतः घरांच्या नुकसानीमध्ये ३५ पैकी १९ प्रकरणांत एकूण नुकसान ८.७९ लाख नुकसान झाले. त्यापैकी मदत १.२१ लाख मदत वितरित करण्यात आली. अंशतः गोठ्यांचे नुकसान झालेल्या ९ पैकी ३ प्रकरणांत ३.५४ लाख नुकसान झाले. त्यात मदत ९ हजार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पशुधन हानीमध्ये २ प्रकरणे असून, ८० हजार ५०० नुकसानीपैकी ६९ हजार ५०० मदत करण्यात आली. मृत व्यक्ती अथवा जखमी व्यक्ती, असे कोणतेही प्रकरण नोंदले गेले नाही. एकूण नुकसानाची रक्कम १३ लाख ९२ हजार २५१ असून, त्यापैकी ३ लाख १९ हजार ५०० इतकी मदत आतापर्यंत वितरित झाली आहे तसेच १ लाख ९ हजार ९०० इतकी निधीची मागणी शिल्लक आहे.
---
चौकट
शेतकऱ्यांना २ लाख १७ हजारांचे अनुदान
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या १११ शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. या शेतकऱ्यांच्या २५.५९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून, सर्व शेतकऱ्यांचे डीबीटी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण झाले आहे. शासनाकडून एकूण २ लाख १७ हजारांचे अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
कोट
दरवर्षी तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान होते. प्रशासनाच्यावतीने त्याचे रीतसर पंचनामे होतात; मात्र त्याबद्दल मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी मिळते. शासन, प्रशासनाने याचा विचार करावा.
- समीर पारधी, शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.